राजकारणात जिवंत राहण्यासाठी राज ठाकरे माझं नाव घेताहेतः ओवैसी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 12:27 PM2018-12-05T12:27:56+5:302018-12-05T12:28:56+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशात दंगल घडवण्याचा कट आखण्यात आल्याचा दावा राज यांनी विक्रोळी येथील सभेत केला होता.
नवी दिल्लीः ओवैसी बंधूंना हाताशी धरून राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात दंगली घडवण्याचा कट भाजपा रचत आहे, असा आरोप करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांवर तुम्ही हल्ले का करताय? समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांनी आमच्यावर आरोप करण्याआधी जरा आत्मपरीक्षण करायला हवं. राजकारणात जिवंत राहण्यासाठी आमचं नाव घेत असाल, तर आमची हरकत नाही, असं असदुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरेंना सुनावलं.
#राजठाकरे#विक्रोळीमहोत्सव
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) December 3, 2018
आज मला दिल्लीवरून समजलेली बातमी अतिशय गंभीर आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये ह्या देशात राम मंदिरच्या मुद्दयांवर दंगली घडविण्यासाठी ओवेसी सारख्या लोकांबरोबर बोलणी सुरु आहेत.
कारण ह्या नाकर्त्या सरकारला हिंदू-मुस्लिम दंग्यांवर निवडणूक लढवायची आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशात दंगल घडवण्याचा कट आखण्यात आल्याचा दावा राज यांनी विक्रोळी येथील सभेत केला होता. ओवैसी बंधूंच्या मदतीनं हा दंगली घडवण्याचा कट आखला जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. दिल्लीतील एका व्यक्तीनं फोनवरून आपल्याला ही माहिती दिल्याचं ते म्हणाले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.
शिवसेनेनं राज यांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. 'दंगलीच्या कटाची माहिती असेल, तर पोलिसांना सांगा', असा टोला शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी काल लगावला. त्यानंतर आज ओवैसी यांनीही राज यांच्या आरोपांचा समाचार घेतला.