Ram Mandir: राम मंदिरासाठी मिळणाऱ्या देणग्यांमध्ये तिप्पट वाढ, एकदा मोजण्यासाठी लागले १५ दिवस, आकडा पाहून विस्फारतील डोळे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 11:51 AM2023-03-14T11:51:29+5:302023-03-14T11:51:52+5:30
Ram Mandir: अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरासाठी गोळा करण्यात येत असलेल्या रोख देणग्यांमध्ये तिप्पटीने वाढ झाली आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्टच्या एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे.
अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरासाठी गोळा करण्यात येत असलेल्या रोख देणग्यांमध्ये तिप्पटीने वाढ झाली आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्टच्या एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणावर रोख रकमेच्या स्वरूपात देणग्या दिल्या जात आहेत.
टस्ट्रचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, डोनेशन बॉक्समधून मिळणाऱ्या पैशांची मोजणी आणि ते जमा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या बँक अधिकाऱ्यांनी ट्रस्टला याबाबतची माहिती दिली आहे. तसेच मिळणाऱ्या पैशांमध्ये आधीच्या तुलनेत तीन पटीने वाढ झाली आहे.
प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, राममंदिरासाठीच्या दानपात्रातून एकदा जे पैसे काढले जातात, ते मोजण्यासाठी १५ दिवसांचा वेळ लागतो. तसेच त्यांनी सांगितले की, केवळ १५ दिवसांमध्ये दानाची रक्कम ही १ कोटी रुपये एवढी झाली आहे. राम मंदिरातील दानपात्र दर १० दिवसांनी उघडलं जातं.
त्यांनी सांगितले की, भारतीय स्टेट बँकेने राम मंदिराच्या दान पत्रात दिल्या जाणाऱ्या पैशांची मोजणी करण्यासाठी आणि पुन्हा मोजणी करून ते बँकेत जमा करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनीही याबाबत सांगितले की, मंदिरात येणाऱ्या निधीच्या पैशामध्ये वेगाने वाढ झाली आहे.
ते पाहून येणाऱ्या काळात त्यासाठी तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणे येथे व्यवस्था करावी लागेल. तिरुपती बालाजी मंदिरामध्ये भक्तांकडून दिल्या जाणाऱ्या दानाच्या पैशांची मोजणी करण्यासाठी तिथे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ते याची मोजणी करतात.