नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात पर्यायी घटनात्मक उपाय ठाऊक - रविशंकर प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 01:52 AM2020-01-02T01:52:02+5:302020-01-02T01:52:16+5:30
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध केरळ विधानसभेने ठराव संमत केला असून, अन्य काही राज्ये या कायद्याला विरोध करीत असल्याने केंद्र आणि राज्यांदरम्यान वादाला तोंड फुटले आहे.
Next
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध केरळ विधानसभेने ठराव संमत केला असून, अन्य काही राज्ये या कायद्याला विरोध करीत असल्याने केंद्र आणि राज्यांदरम्यान वादाला तोंड फुटले आहे. राज्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर केंद्र सरकारला विरोध करणे सुरू ठेवलेच, तर घटनात्मक उपाय काय करायचा, हे आम्हाला ठाऊक आहे, असा इशारा केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी कायद्याला विरोध करणाऱ्या राज्यांना दिला आहे.