नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील इंदू मल्होत्रा व उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या.के. एम. जोसेफ यांना सर्वोच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याची शिफारस करण्याचा निर्णय सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील ‘कॉलेजियम’ने गुरुवारी घेतला.थेट वकिलांमधून नेमल्या जाणा-या इंदू मल्होत्रा या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरतील. सध्या या न्यायालयात न्या. आर. भानुमती या एकमेव महिला न्यायाधीश आहेत.याखेरीज सध्या कार्यवाहकमुख्य न्यायाधीश असलेल्या पाचउच्च न्यायालयांवर नेमायच्या नियमित मुख्य न्यायाधीशांची नावेही ‘कॉलेजियम’ने नक्की केली.त्यानुसार हे नवे मुख्यन्यायाधीश असे असतील- न्या. जे. भट्टाचार्य (दिल्ली), न्या. टी. बी. राधाकृष्णन (आंध्र प्रदेश), न्या. अभिलाषा कुमारी (मणिपूर), न्या. ए. डॉमिनिक (केरळ), न्या. अजय रस्तोगी (त्रिपुरा) आणि न्या. सूर्यकांत (हिमाचल प्रदेश).
सुप्रीम कोर्टावर दोन न्यायाधीशांची शिफारस, ‘कॉलेजियम’ने घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:22 AM