कमाईची 'सुवर्ण' संधी! मे महिन्यात गोल्ड बॉन्ड्सची विक्रमी विक्री, 54 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 05:25 PM2020-05-25T17:25:11+5:302020-05-25T17:43:04+5:30
गेल्या एक वर्षात गोल्डवर 40 टक्के रिटर्न मिळाले आहेत. वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या एका रिपोर्टनुसार, 2020च्या पहिल्या तिमाहीदरम्यान गोल्डमध्ये जबरदस्त इन्वेस्टमेंट झाली. दरवर्षीचा विचार करता, यावेळी गोल्ड डिमांड 80 टक्क्यांनी वाढून 539.6 टन राहिली.
नवी दिल्ली : सरकारने मे महिन्यात गोल्ड बॉन्ड्सच्या माध्यमातून 25 लाख यूनिट विकून 1,168 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतीय रिझर्व बँकेने जारी केलेल्या आकड्यांवरून सहज लक्षात येते, की सॉवरेन गोल्ड बॉन्ड्सच्या माध्यमातून झालेली ही सर्वात मोठी कमाई आहे. हा गोल्ड बॉन्ड 11 ते 15 मेदरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. यात एक युनिट गोल्डचा भाव 4,590 रुपये एवढा होता. गोल्ड बॉन्डचा एक युनिट म्हणमजे एक ग्राम असतो.
एप्रिल महिन्यात 822 कोटींची कमाई -
आतापर्यंत सॉवरेन गोल्ड बॉन्डचे 39 सब्सक्रिप्शन जारी करण्यात आले आहेत. गोल्ड बॉन्डच्या माध्यमाने मे महिन्यापूर्वी सर्वाधिक कमाई ऑक्टोबर 2016मध्ये झाली होती. ऑक्टोबर 2016मध्ये एकूण 1,082 कोटी रुपयांचे सब्सक्रिप्शन झाले होते. यात एकूण 35.98 लाख यूनिट्सची विक्री झाली होती. एप्रिल 2020मध्ये गुंतवणूकदारांनी 17.73 लाख यूनिट्स विकत घेतले. याची एकूण किंमत 822 कोटी रुपये एवढी आहे.
जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा
सोन्याच्या गुंतवणुकीत सर्वाधिक तेजी -
गेल्या एक वर्षात गोल्डवर 40 टक्के रिटर्न मिळाले आहेत. वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या एका रिपोर्टनुसार, 2020च्या पहिल्या तिमाहीदरम्यान गोल्डमध्ये जबरदस्त इन्वेस्टमेंट झाली. दरवर्षीचा विचार करता, यावेळी गोल्ड डिमांड 80 टक्क्यांनी वाढून 539.6 टन राहिली.
54,000 हजारांवर जाऊ शकतो सोन्याचा भाव -
सोन्याचा भाव पुन्हा एकदा 47,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्याही पुढे गेला आहे. काही तज्ज्ञांच्यामते पुढील 12 महिन्यांत सोन्याचा भाव 54,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो. गोल्ड बॉन्डमध्ये इनव्हेस्ट करणाऱ्यांना सोन्याचे दर वाढण्याचा फायदा तर मिळतोय. पण 2.5 टक्के निश्चित व्याजही मिळते.
पुढील सब्सक्रिप्शन केव्हा होणार खुले?
आपल्याला हे माहीत असणेही आवश्यक आहे, की या बॉन्ड्सचा कालावधी 8 वर्षांचा असतो आणि 5व्या वर्षानंतरच प्रीमॅच्युअर विड्रॉल केले जाऊ शकते. आरबीआयने म्हटले आहे, की 8 जूनपासून गोल्ड बॉन्ड्सचे पुढील सब्सक्रिप्शन खुले होईल.