दिल्ली पोलीस दलात 5,846 पदांसाठी निघाली भरती, असा करा अर्ज...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 03:05 PM2020-08-04T15:05:59+5:302020-08-04T15:06:17+5:30
आपणास या पदांवर अर्ज करायचे असल्यास खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतरच अर्ज करा.
नवी दिल्लीः दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबलच्या पदांवर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) दिल्लीत कॉन्स्टेबल (Executive)च्या 5846 पदांची भरती करणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 7 सप्टेंबर 2020 पर्यंत अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. ही भरती बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहे. आपणास या पदांवर अर्ज करायचे असल्यास खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतरच अर्ज करा.
महत्त्वाच्या तारखा
भरती जाहिरात प्रकाशन तारीख - 01 ऑगस्ट 2020
अर्ज करण्याची प्रारंभ तारीख - 01 ऑगस्ट 2020
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 7 सप्टेंबर 2020
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 9 सप्टेंबर 2020
ऑफलाइन चलानमधून अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख - 14 सप्टेंबर 2020
संगणक आधारित परीक्षा (सीबीटी) तारीख - 27 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2020
पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाचा उमेदवार 12वी पास असणं आवश्यक
वय श्रेणी
उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असावे.
अर्ज फी
जनरल, ओबीसी, पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे.
महिला उमेदवार तसेच एससी-एसटी आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी अर्ज फी नाही.
भीम, यूपीआय, नेट बँकिंग, व्हिसा, मास्टर कार्ड इत्यादीद्वारे उमेदवार ऑनलाईन पेमेंट करू शकतात. याशिवाय बँक चलान ऑफलाइन पद्धतीनेही लागू करता येईल.
अर्ज कसा करावा
इच्छुक आणि पात्र उमेदवार एसएससी वेबसाइट ssc.nic.in वर लॉग इन करून अर्ज करू शकतात.