देशसेवा करण्याची सुवर्णसंधी, भारतीय नौदलात वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 03:28 PM2018-02-13T15:28:58+5:302018-02-13T15:32:08+5:30

भारतीय नौदलात भरती सुरु असून देशसेवा करण्याची सुवर्णसंधी आहे

recruitment in Indian Navy | देशसेवा करण्याची सुवर्णसंधी, भारतीय नौदलात वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरु

देशसेवा करण्याची सुवर्णसंधी, भारतीय नौदलात वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरु

googlenewsNext

नवी दिल्ली - भारतीय नौदलात भरती सुरु असून देशसेवा करण्याची सुवर्णसंधी आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती काढण्यात आली आहे. अर्ज करणा-या उमेदवारांनी 60 टक्क्यांसोबत अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली असणं अनिवार्य आहे. या पदांसाठी तेच उमेदवार अर्ज करु शकतात ज्यांचा जन्म 1 जुलै 1999 ते 2 जानेवारी 1994 दरम्यान झालेला आहे. 

शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी पदवी किंना त्यासमान पदवी मिळवलेली असल्यास तुम्ही अर्ज करु शकता. 

पदांची संख्या - 19 

कोणत्या पदांसाठी भरती सुरु आहे - 
1. एअर ट्राफिक कंट्रोलर (Air Traffic Controller - ATC)
2. ऑब्झर्व्हर (Observer)
3. पायलट - एमआर (Pilot - MR)
4. पायलट - एमआरव्यतिरिक्त (Pilot - Other Than MR)

भरतीची जाहिरात निघालेली तारीख - 10-02-2018

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 04-03-2018

वयाची अट काय आहे -
उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 1994 ते 1 जानेवारी 1998 (ब्रांच 1) / 2 जानेवारी 1995 ते 1 जानेवारी 2000  (ब्रांच - 2,3,4) दरम्यान झालेला असावा. 

निवड कशाप्रकारे केली जाणार ?
सर्व्हिस सिलेक्शन बोर्डातील (एसएसबी) मुलाखतीमधील प्रदर्शाननुसार उमेदवारांची निवड केली जाईल

पगार किती असेल ?
उप लेफ्टनंट - 56,100 - 1,10,700 /- रुपये
लेफ्टनंट - 61,300 - 1,20,900 /- रुपये
लेफ्टनंट कमांडर - 69,400 - 1,36,900 /- रुपये
कमांडर - 1,21,200 - 2,12,400 /- रुपये
 

Web Title: recruitment in Indian Navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.