Corona Vaccination: तरुणांनो! तयारीला लागा; १८ वर्षांवरील लसीकरणासाठी नोंदणी २८ एप्रिलपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 04:35 AM2021-04-23T04:35:00+5:302021-04-23T04:35:12+5:30
corona vaccination above 18 years : कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारने वयोमर्यादा शिथिल करतानाच खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविण्यासाठी खासगी कंपन्या, औद्योगिक क्षेत्र तसेच कार्पोरेट क्षेत्र, खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी दिली. 1 मेपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यासाठी कोविन वेबसाईट तसेच आरोग्य सेतू ॲपच्या माध्यमातून नोंदणी सुरू होणार असल्याचे ट्वीट डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे.
एस. के. गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कारोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना लस टोचण्यात येणार आहे. त्यासाठी २८ एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार आहे. केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत घोषणा केली. कोविन वेबसाईट आणि आरोग्य सेतू ॲपच्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे. विना नोंदणी लसीकरण होणार नाही, असे डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. अनेक राज्यांनी मोफत लस देण्याचे जाहीर केले होते. त्यादृष्टीने राज्य सरकारांनीही तयारी सुरू केली आहे.
कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारने वयोमर्यादा शिथिल करतानाच खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविण्यासाठी खासगी कंपन्या, औद्योगिक क्षेत्र तसेच कार्पोरेट क्षेत्र, खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी दिली. 1 मेपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यासाठी कोविन वेबसाईट तसेच आरोग्य सेतू ॲपच्या माध्यमातून नोंदणी सुरू होणार असल्याचे ट्वीट डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे.
. गोवा सरकारतर्फे
मोफत लसीकरण
n गोवा सरकारने राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा केली आहे.
n केंद्राने खरेदीची परवानगी दिल्यानंतर गोवा सरकार पहिल्या टप्प्यात सीरम इंस्टिट्यूटकडून 5 लाख डोस खरेदी करणार आहे.
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र
n छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेष बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन पत्र लिहून लसींच्या उपलब्धतेबाबत माहिती पुरविण्याची विनंती केली आहे. राज्य सरकारने सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे.