रेल्वेचा मोठा निर्णय, 'या' तारखेपर्यंत नियमित गाड्या धावणार नाहीत, 100% परतावा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 10:40 PM2020-06-25T22:40:24+5:302020-06-25T22:47:53+5:30

रेल्वेने लॉकडाऊन वाढविला असून 12 ऑगस्टपर्यंत नियमित रेल्वेचा प्रवास करता येणार नाही.

Regular Passenger Trains Canceled Till 12 August | रेल्वेचा मोठा निर्णय, 'या' तारखेपर्यंत नियमित गाड्या धावणार नाहीत, 100% परतावा मिळणार

रेल्वेचा मोठा निर्णय, 'या' तारखेपर्यंत नियमित गाड्या धावणार नाहीत, 100% परतावा मिळणार

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वे मंत्रालयाने सोमवारी सर्व परिमंडळांना एक परिपत्रक देऊन 14 एप्रिल रोजी किंवा आधी बुक केलेल्या सर्व तिकिटांचे रिफंड करावे, असे सूचित केले होते. 12 ऑगस्टपर्यंत नियमित ट्रेनचे बुकिंग केले असेल तर 100% परतावा मिळणार आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहता रेल्वे बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने लॉकडाऊन वाढविला असून 12 ऑगस्टपर्यंत नियमित रेल्वेचा प्रवास करता येणार नाही. म्हणजेच पॅसेंजर, मेल एक्स्प्रेस, उपनगरीय रेल्वे गाड्या 12 ऑगस्टपर्यंत धावणार नाहीत.याशिवाय, जर कोणी 12 ऑगस्टपर्यंत नियमित ट्रेनचे बुकिंग केले असेल तर त्याला 100% परतावा मिळणार आहे. 

रेल्वे बोर्डाने 13 मे रोजी दिलेल्या आदेशात सांगितले होते की, नियमित गाडीचे बुकिंग 30 जूनपर्यंत रद्द केले जात असून प्रवाशांना पूर्ण परतावा मिळेल. आता रेल्वे रद्द करण्याची तारीख वाढविण्यात आली असल्याने परतावा सुविधा देखील 12 ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे. या कालावधीत, 12 मे पासून धावणाऱ्या विशेष राजधानी गाड्या आणि 1 जूनपासून धावणाऱ्या विशेष मेल / एक्स्प्रेस गाड्या पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.

तत्पूर्वी, रेल्वे मंत्रालयाने सोमवारी सर्व परिमंडळांना एक परिपत्रक देऊन 14 एप्रिल रोजी किंवा आधी बुक केलेल्या सर्व तिकिटांचे रिफंड करावे, असे सूचित केले होते. आतापर्यंत रेल्वेने 30 जूनपर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र, नवीन परिपत्रकानुसार, हे 12 ऑगस्टपर्यंत करण्यात आले आहे.

रेल्वेच्या नियमांनुसार, रेल्वेचे तिकीट जास्तीत जास्त १२० दिवस अगोदर आरक्षित केले जाऊ शकते. आता जेव्हा रेल्वेने 14 एप्रिल आणि त्यापूर्वीच्या सर्व तिकिटांचा परतावा करण्यास सांगितले आहे. म्हणजेच 15 ऑगस्टपूर्वी बुक केलेल्या सर्व तिकिटांचे पैसे परत केले जातील. 

सूत्रांच्या माहितीनुसार, रेल्वेकडून आता मागणी पूर्ण करण्यासाठी ज्या अतिरिक्त गाड्या चालविण्यात येत आहेत. त्या विशेष गाड्यांच्या श्रेणीत ठेवल्या जातील. सध्या सुमारे 230 मेल आणि एक्सप्रेस गाड्या धावत आहेत, नवीन गाड्या देखील अशाच असतील.

आणखी बातम्या...

इम्रान खान यांच्याकडून ओसामा बिन लादेनचा 'शहीद' असा उल्लेख

कोरोनाचा 'या' विमान कंपनीला फटका; सहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार

ठाकरे मंत्रिमंडळाने घेतले 12 महत्त्वाचे निर्णय; वस्तू व सेवाकर अधिनियमात मोठी सुधारणा

शेतकऱ्याची कमाल! पिकवले अनोखे 'कलिंगड', बाहेरून 'हिरवे' अन् आतून 'पिवळे'

आयुक्तांच्या बदल्यांमागे एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न - प्रवीण दरेकर

Web Title: Regular Passenger Trains Canceled Till 12 August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.