Republic Day 2020: प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडली ४८ वर्षाची 'ही' परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 11:00 AM2020-01-26T11:00:07+5:302020-01-26T11:02:50+5:30
1971 मधील भारत-पाक युद्धाच्या शहीदांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडिया गेट येथे 1972 मध्ये तयार करण्यात आले होते.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रजासत्ताक दिनी 48 वर्षांची परंपरा मोडून नवीन परंपरेची सुरुवात केली. पंतप्रधान पहिल्यांदा योद्धाच्या हुतात्म्यास अभिवादन करण्यासाठी इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे गेले नाहीत, तर हुतात्म्यांशेजारी नव्याने बांधलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकास्थळी जाऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी देशातील पहिल्या सीडीएसव्यतिरिक्त तिन्ही सैन्याच्या प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले.
1971 मधील भारत-पाक युद्धाच्या शहीदांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडिया गेट येथे 1972 मध्ये तयार करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, अमर जवान ज्योती या तीन महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रमुख नेत्यांसह तिन्ही दलाचे सैन्य प्रमुख आदरांजली वाहण्यासाठी जात असतात. यावेळी प्रथमच प्रजासत्ताक दिन समारंभात सीडीएस( चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) सहभागी होत आहेत.
Delhi: PM Modi leads the nation in paying tributes to soldiers who lost their lives in the line of duty, by laying a wreath at National War Memorial. CDS Gen Bipin Rawat, Army Chief Gen Naravane, Navy Chief Admiral Karambir Singh, Air Force Chief Air Marshal RKS Bhaduria present. pic.twitter.com/CGTWo2Co4Y
— ANI (@ANI) January 26, 2020
माजी लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी 1 जानेवारीला सीडीएसचा पदभार स्वीकारला. लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे, हवाई दल प्रमुख आरके से भदौरिया आणि नेव्ही चीफ अॅडमिरल करमबीर सिंह यांनी गेल्या वर्षी लष्करातील सर्वोच्च पदे भूषविली आहेत.
44 एकरांवर पसरलेले युद्ध स्मारक चार स्तंभांनी बनलेले आहेत - अमर चक्र, शौर्य चक्र, संन्यास चक्र आणि रक्षक चक्र, 25,942 जवानांची नावे ग्रॅनाइट टॅब्लेटवर सोन्याच्या अक्षरांनी लिहिलेली आहेत. पंतप्रधानांनी मागील वर्षी 25 फेब्रुवारी रोजी देशाचे 44 एकर युद्ध स्मारक देशाला समर्पित केले होते
महत्त्वाच्या बातम्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण
'असा' साजरा झाला स्वतंत्र भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन! पाहा ऐतिहासिक फोटो
तिरंग्याबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
प्रजासत्ताक दिनाबाबतच्या १० इंटरेस्टींग गोष्टी!
देशभक्तीची भावना जागृत करणारी बॉलिवूडची गाणी...!!