सीए परीक्षेचा निकाल जाहीर, मोहित गुप्ता देशात प्रथम, प्रशांत देशात दुसरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 07:37 PM2018-01-17T19:37:00+5:302018-01-17T20:15:35+5:30

द इन्स्ट्यिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियातर्फे नोव्हेंबर 2017 रोजी घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटन्टच्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला.

The results of the CA examination, Mohit Gupta is the first in the country, the second in the Pacific country | सीए परीक्षेचा निकाल जाहीर, मोहित गुप्ता देशात प्रथम, प्रशांत देशात दुसरा

सीए परीक्षेचा निकाल जाहीर, मोहित गुप्ता देशात प्रथम, प्रशांत देशात दुसरा

Next

नवी दिल्ली : द इन्स्ट्यिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियातर्फे नोव्हेंबर 2017 रोजी घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटन्टच्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा दोन्ही ग्रुपचा एकूण निकाल 22.76 टक्के लागला असून, या परीक्षेत मुलांनी बाजी मारली आहे. पहिल्या तिन्ही क्रमांकावर मुलांनीच वरचष्मा गाजवला आहे. हरियाणातील कर्नाल येथील मोहित गुप्ता याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

देशात पहिला क्रमांक पटकवलेल्या मोहितला 73.38 टक्के गुण मिळवले आहे. दुसऱ्या क्रमांवर नवी दिल्लीतील प्रशांत या विद्यार्थ्यांनी 71.38 टक्के गुण मिळवित बाजी मारली आहे. तर दिल्लीच्याच आदित्य मित्तल याने 70.62 टक्के गुण मिळवित तिसरे स्थान पटकावले आहे.

द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियातर्फे नोव्हेंबर 2017मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला एकूण 60 हजार 586 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, देशभरातील 327 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, एकूण 9 हजार 489 विद्यार्थी यंदा पात्र ठरले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात वाढ झाली होती. गेल्या वेळीचा एकूण निकाल 11.57 टक्के लागला आहे. यंदा हा निकाल 22.76 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, पहिल्या तीन क्रमांकांवर मुलांनी छाप सोडली आहे.

इन्स्टिट्यूटतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ग्रुप 1च्या परीक्षेत एकूण 39 हजार 328 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 15.91 म्हणजेच 6 हजार 257 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ग्रुप 2 मध्ये एकूण 15.11 टक्के निकाल लागला आहे. यंदा ग्रुप 2 लाख 39 हजार 753 विद्यार्थी बसले होते. तर दोन्ही ग्रुपमध्ये परीक्षा दिलेल्या एकूण 30 हजार 054 परीक्षा दिलेल्यांपैकी 6 हजार 841 विद्यार्थी पास झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: The results of the CA examination, Mohit Gupta is the first in the country, the second in the Pacific country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा