- शीलेश शर्मानवी दिल्ली : राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेणार नाही ही ठाम भूमिका घेतल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. हजारो कार्यकर्ते मंगळवारी सकाळी काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधींनी राजीनामा परत घ्यावा या मागणीसाठी उपोषणाला बसल्यावर या घबराटीचे संकेत मिळाले.रघुपती राघव राजा राम.....ही धून वाजत राहिली व दिवसभर हे कार्यकर्ते ४४ अंश तापमानात राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा परत घ्या अशी मागणी करीत होते.दिल्ली प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी डॉ. नरेश कुमार यांनी सांगितले की, जोपर्यंत राहुल राजीनामा परत न घेण्याचा आग्रह सोडतील तोपर्यंत पक्ष कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर दबाब कायम राहील.नरेश कुमार यांची भूमिका अशी आहे की, काँग्रेस अशा एका टप्प्यातून प्रवास करीत आहे की जेव्हा त्याला राहुल गांधी यांच्या प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. कारण राहुल गांधी यांच्याशिवाय पक्षात दुसरा नेता पक्षाला ना एकत्र ठेवू शकेल ना नरेंद्र मोदी- अमित शहा यांच्याशी थेट संघर्ष करू शकेल.उपोषणस्थळी पक्षाचे वरिष्ठ नेतेही होते. एक नेता गेला की दुसरा उपोषणकर्त्यांचा उत्साह कायम टिकवण्यासाठी तेथे येत गेला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक संकल्प पत्रदेखील सादर केले त्यात राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा परत घ्या अशी मागणी करण्यात आली आहे.राहुल गांधी यांच्यावर राजीनामा परत घेण्यासाठी एकीकडे दबाब वाढत असताना दुसरीकडे काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्षाच्या नावावर चर्चाही सुरू झाली आहे.आतापर्यंत जे नेते अध्यक्षपदासाठी चर्चेत होते त्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे सगळ््यात प्रबळ समजले गेले. त्यांच्याशिवाय अशोक गहलोत, मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आजाद व इतरांची नावे आहेत. परंतु, राहुल गांधी यांच्याशी ज्या युवक नेत्यांचा थेट संपर्क आहे ते जुन्या नेत्यांसोबत पक्षाला पुढे नेण्याच्या बाजुने नाहीत. अशाच एका नेत्याने ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, आता पक्षात दोन विचारधारांवरून संघर्ष आहे.कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्नकाँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये या मागणीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्याने मंगळवारी येथे आत्महत्येचा प्रयत्न केला. या कार्यकर्त्याचे नाव समजले नाही. त्याने पक्षाच्या कार्यालयाबाहेर असलेल्या झाडाला फास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पक्ष कार्यकर्ते व पोलिसांनी त्याला झाडावरून खाली घेतले. राहुल गांधी यांनी राजीनामा परत घेतला नाही तर मी फाशी घेईन, असे त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले.
राहुल गांधी राजीनामा परत घ्या; कार्यकर्त्यांचे उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 5:35 AM