देशात रस्ते अपघातात १२ टक्क्यांनी वाढ, धक्कादायक रिपोर्ट आला समोर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 01:00 PM2023-11-01T13:00:07+5:302023-11-01T13:22:51+5:30

गेल्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये एकूण ४,६१,३१२ रस्ते अपघातांची नोंद झाली, ज्यामध्ये १,६८,४९१ लोकांचा मृत्यू झाला.

road accident report 2023 road accidents increased by 12 percent in the country | देशात रस्ते अपघातात १२ टक्क्यांनी वाढ, धक्कादायक रिपोर्ट आला समोर!

देशात रस्ते अपघातात १२ टक्क्यांनी वाढ, धक्कादायक रिपोर्ट आला समोर!

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासंदर्भातील रिपोर्ट केंद्र सरकारने जाहीर केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात रस्ते अपघातांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, या रिपोर्टमध्ये रस्ते अपघात वाढण्याची कारणेही नमूद करण्यात आली आहेत. 

रिपोर्टनुसार, गेल्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये एकूण ४,६१,३१२ रस्ते अपघातांची नोंद झाली, ज्यामध्ये १,६८,४९१ लोकांचा मृत्यू झाला. तर  ४,४३,३६६ लोक अपघाताच्या घटनेत जखमी झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत रस्ते अपघातात ११.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मृतांमध्ये ९.४ टक्के आणि जखमींच्या संख्येत १५.३ टक्के वाढ झाली आहे.

या कारणांमुळे रस्ते अपघात?
रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण ओव्हरस्पीडिंग असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. याशिवाय, बेदरकारपणे वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे, अशा कारणांमुळे रस्ते अपघातात वर्षानुवर्षे वाढ होत आहे.

हेल्मेट न घालणे सर्वात धोकादायक!
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हेल्मेट नसल्यामुळे बाईक चालवताना झालेल्या अपघातात ५० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे आहे. बाईक चालवताना झालेल्या अपघातात ३५,६९२ लोकांचा मृत्यू झाला. तर १४, ३३७लोक हेल्मेटशिवाय दुचाकीवर बसल्याने मरण पावले.

सीट बेल्ट न लावणे हे देखील मृत्यूचे कारण
आकडेवारीनुसार, सीट बेल्ट न बांधलेल्या १६,७१५ लोकांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यापैकी ८३०० लोक कार चालवत होते, तर ८३३१ लोक कारमधून प्रवास करत होते. दरम्यान, अशा रस्ते अपघातांपासून लोकांना वाचवायचे असेल तर त्यांना जागरूक करावे लागेल, जेणेकरून अधिकाधिक जीव वाचवता येतील. चालकांसाठी विविध शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याची गरज आहे, असे सरकारचे मत आहे.

Web Title: road accident report 2023 road accidents increased by 12 percent in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.