हरियाणात शिकविणार रोहनात गावाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 07:09 AM2022-03-31T07:09:42+5:302022-03-31T07:10:00+5:30
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर २०१८मध्ये या गावात गेले होते व त्यांनी प्रथम तिरंगा फडकावला होता
बलवंत तक्षक
चंडीगड : स्वतंत्र भारतातील गुलाम गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरियाणाच्या रोहनात गावाची गोष्ट आता विद्यार्थ्यांना शाळेत शिकवली जाणार आहे. स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे या गावात ध्वजारोहण का करण्यात आले नाही? इंग्रजांच्या राजवटीत या गावातील लोकांना त्यांची जमीन व अन्य अधिकारांपासून का वंचित करण्यात आले? या गावातील लोकांनी ६८ वर्षांनंतरही तिरंगा का फडकावला नाही, हे सर्व शिकवले जाईल.
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर २०१८मध्ये या गावात गेले होते व त्यांनी प्रथम तिरंगा फडकावला होता. यानंतर २०१९मध्ये या गावातील सर्वांत जास्त शिकलेली मुलगी रिनू बुरा हिने ध्वजारोहण केले.