नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या उद्रेकाच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर मोठा परिणाम झाला आहे. एकीकडे कंपन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या, तर दुसरीकडे ग्राहकांच्याही नोकऱ्यांवर संकट असल्याने अस्थिर भविष्यामुळे त्यांनी पाठ फिरविली आहे. एप्रिल महिन्यात तर कंपन्यांची शून्य विक्री झाली आहे. यामुळे तीन-सहा महिन्यांचा वेटिंग पिरिएड ठेवणाऱ्या रॉयल एन्फिल्डलाही झुकावे लागले आहे.
भारताची दणकट बाईक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बुलेटच्या सर्व मॉडेलवर कधी नव्हे तो १० हजार रुपयांचा डिस्काऊंट ठेवण्यात आला आहे. ग्राहकाने रॉयल एन्फिल्डची कोणतीही बाईक खरेदी केल्यास ग्राहकाला १०००० रुपयांचे फायदे दिले जाणार आहेत. यामध्ये मोटारसायकलच्या अॅक्सेसरीज, एक्सटेंडेड वॉरंटी, हेल्मेट आणि अन्य अॅक्सेसरीजवर २० ट्क्के सूट देण्यात येणार आहे. यातील ग्राहक त्यांच्या गरजेनुसार कोणताही पर्याय निवडू शकणार आहेत.
ही ऑफर ठराविक काळासाठी असून ३१ मे २०२० पर्यंत या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. या ऑफरचा लाभ रॉयल एन्फिल्डच्या जुन्या ग्राहकांनाही मिळणार आहे. ज्यांनी लॉकडाऊन आधी बाईक बूक केली आहे आणि ज्यांना अद्याप डिलिव्हरी मिळालेली नाही, अशांना देखील ही ऑफर उपलब्ध आहे. एप्रिलमध्ये जादातर कंपन्यांची विक्री शून्यावर आली आहे. मात्र, रॉयल एन्फिल्डने या महिन्यात ९१ बाईक विकल्या आहेत. महत्वाचे म्हणजे लॉकडाऊन काळातही ग्राहकांनी बाईक बुक केली आहे. आता ते डिलिव्हरी कधी मिळेल याची वाट पाहत आहेत.
दोन नवीन बाईक येणार?रॉयल एन्फिल्ड भारतात दोन नवीन बाईक लाँच करणार आहे. Meteor 350 Fireball या धाकड बाईकला भारतात चाचणी घेताना पाहिले गेले आहे. तसेच Scrambler 650 देखील लवकरच भारतीय बाजारात येण्याची वाट पाहत आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...
CoronaVirus चीनला मोठा झटका! कायमचा बायबाय करत 'ही' जुनी कंपनी येतेय भारतात
एका पॉर्न मॅगझिनने Kim Jong Unचे वाटोळे केले; हुकूमशहा पित्याने दिली मोठी शिक्षा
CoronaVirus बापरे! देश हादरला; कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने चीनलाही टाकले मागे
सज्ज व्हा! राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा
सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार