नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चिनी कंपनीला प्रायोजक बनवल्याने विरोध व्हायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सबंधित स्वदेशी जागरण मंचने, लोकांनी टी-20 क्रिकेट लीगचा बहिष्कार कण्यासंदर्भात विचार करायला हवा, असे आवाहन केले आहे.
'हा सैनिकांचा अपमान' -स्वदेशी जागरण मंचने म्हटले आहे, टी-20 क्रिकेट सामन्यांचे आयोजन करणाऱ्या, इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) एका चिनी मोबाईल कंपनीला प्रायोजक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय आश्चर्य कारक आहे. आपल्या या निर्णयाने आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने चीनच्या कृत्यामुळे वीरमरण आलेल्या सैनिकांचा अपमान केला आहे.
चीनचा विरोध व्हायला हवा -स्वदेशी जागण मंचने म्हटले आहे, 'सध्या, आपला देश बाजारांतील चिनी प्रभूत्व नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. चिनी सामान आपल्या बाजारापासून दूर ठेवण्यासाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. चिनी गुंतवणूक आणि चिनी कंपन्यांना बाहेर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे असताना, आयपीएलचे हे कृत्य केवळ देशाच्या भावने विरोधातीलच नाही, तर देशाची सुरक्षा आणि आर्थिक चिंतेचाही अनादर करणारे आहे.
स्पॉन्सर बदला अन्यथा... -स्वदेशी जागरण मंचने म्हटले आहे, की आम्ही आयपीएल आयोजकांना विनंती करतो, की त्यांनी चिनी कंपन्यांना आपल्या प्रायोजकांच्या रुपात परवानगी देण्याचा पुनर्विचार करावा. असे झाले नाही, तर आम्हाला देशभक्त नागरिकांना आयपीएलवर बहिष्कार टाकण्यासाठी आवाहन करावे लागेल. लक्षात असू द्या, की देशाची सुरक्षितता आणि स्वाभिमान याहून काहीही मोठे नाही.
सोशल मीडियावर लोकांची भडास -इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) आगामी सत्रातही चिनी मोबाईल कंपन्यांशी स्पॉन्सरशिप करार कायम राहील. हा निर्णय आयपीएलच्या संचालन परिषदेने रविवारी घेतला आहे. यानंतर सोशल मीडियावर अनेक लोकांनी विरोध दर्शवला. एवढेच नाही, तर लोकांनी चिनी मालाचा बहिष्कार करण्यासंदर्भातही भाष्य केले आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (बीसीसीआय) यानंतर करारासंदर्भात समीक्षा करण्याचेही आश्वासन दिले होते. मात्र, आयपीएलने या कंपनीला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.