नरेंद्र मोदी शिवलिंगावरील विंचवासारखे; शशी थरुर यांचे वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 04:03 PM2018-10-28T16:03:46+5:302018-10-28T16:04:33+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे आहेत, असा उल्लेख त्यांनी केला आहे.
बंगळुरु : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात शशी थरुर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे आहेत, असा उल्लेख त्यांनी केला आहे.
`The Paradoxical Prime Minister' या त्यांच्या पुस्ताकासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहे. बंगळुरुमधील लिट फेस्टमध्ये शशी थरुर यांनी भाग घेतला होता. यावेळी `The Paradoxical Prime Minister' या त्यांच्या पुस्तकातील काही पानांचे त्यांनी वाचन केले. शशी थरुर म्हणाले, निनावी आरएसएसच्या एका सुत्राने पत्रकाराला सांगितले होते. त्याचा उल्लेख मी पुस्तकात केला आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे आहेत. त्याला तुम्ही हाताने हटवू शकत नाही आणि चप्पलने मारु पण शकत नाही.
#WATCH Shashi Tharoor in Bengaluru, says, "There's an extraordinarily striking metaphor expressed by an unnamed RSS source to a journalist, that, "Modi is like a scorpion sitting on a Shivling, you can't remove him with your hand & you cannot hit it with a chappal either."(27.10) pic.twitter.com/E6At7WrCG5
— ANI (@ANI) October 28, 2018
दरम्यान, याआधीही शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. तिरुवनंतपुरममध्ये आयोजित 'नफरत के खिलाफ : वर्तमान भारत में हिंसा और असहनशीलता' कार्यक्रमात शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी शशी थरूर यांनी म्हटले होते की, नरेंद्र मोदी यांना वेगवेगळे कपडे परिधान केलेले बघितले आहे, पण ते कधीही मुस्लीम टोपी घालत नाहीत.