RTO कडून नवीन सुविधा सुरू! 58 सेवा मिळतील ऑनलाइन, घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 04:39 PM2022-09-18T16:39:31+5:302022-09-18T16:44:38+5:30

RTO Services Online : मंत्रालयाने आरटीओशी संबंधित एकूण 58 सेवा ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे.

rto new facility online 58 services adhaar driving license at home | RTO कडून नवीन सुविधा सुरू! 58 सेवा मिळतील ऑनलाइन, घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स

RTO कडून नवीन सुविधा सुरू! 58 सेवा मिळतील ऑनलाइन, घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स

Next

नवी दिल्ली : बदलत्या काळानुसार सरकारी यंत्रणाही आपल्या कार्यपद्धतीत मोठा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, याआधी ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) काढणे, गाडीचे रजिस्ट्रेशन (Vehicle Registration) करणे, गाडीचे रजिस्ट्रेशन नंबर ट्रान्सफर करणे इत्यादी कामांसाठी लोकांना आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या, परंतु आता रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport & Highways) लोकांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला प्रत्येक कामासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही. मंत्रालयाने आरटीओशी संबंधित एकूण 58 सेवा ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या ऑनलाइन सेवांची संख्या 18 वरून 58 करण्यात आली आहे. या संदर्भात MoRTH ने 16 सप्टेंबर 2022 रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत म्हटले आहे की, मंत्रालय नागरिक केंद्रित सुविधा आणि सुधारणांचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. अशाप्रकारे संपर्काशिवाय आणि ऑनलाइन सेवांमुळे (RTO Online Services) लोकांचा वेळ खूप वाचेल. यासोबतच प्रादेशिक परिवहन कार्यालयावरील कामाचा ताणही कमी होईल. याशिवाय कामाचा दर्जाही चांगला राहील.

या नवीन सुविधेत अनेक नवीन सेवांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये आधार किंवा आधारशी संबंधित प्रमाणीकरण (ऑथेंटिकेशन) आवश्यक आहे. आता तुम्हाला लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय, डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स (Duplicate Driving License) तयार करणे, ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करणे, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढणे, गाडीचे रजिस्ट्रेशन करणे, यासारख्या अनेक सेवांचा समावेश आहे. या सेवांसाठी तुम्हाला आता आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही आणि तुम्ही घरबसल्या या सेवांसाठी अर्ज करू शकता.

आधार कार्डशिवाय होऊ शकेल काम
दरम्यान, यासोबतच परिवहन मंत्रालयाने सांगितले आहे की, तुमच्याकडे आधार नंबर नसला तरीही तुम्ही सेंट्रल मोटर व्हेईकल रूल (CMVR) 1989 च्या नियमांनुसार तुमचे काम सहज करू शकता. यासाठी तुम्हाला आधारऐवजी इतर कागदपत्रे द्यावी लागतील. यामध्ये पॅन कार्ड, पासपोर्ट इत्यादी अनेक प्रकारच्या कागदपत्रांचा समावेश आहे.

Web Title: rto new facility online 58 services adhaar driving license at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.