रशियन तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला

By admin | Published: November 14, 2015 01:20 AM2015-11-14T01:20:31+5:302015-11-14T01:20:31+5:30

वाराणसीत पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या एका २३ वर्षीय रशियन तरुणीवर शुक्रवारी सकाळी कथितरीत्या तिच्या प्रियकराने अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना घडली.

Russian acid attack acid attack | रशियन तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला

रशियन तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला

Next

वाराणसी : वाराणसीत पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या एका २३ वर्षीय रशियन तरुणीवर शुक्रवारी सकाळी कथितरीत्या तिच्या प्रियकराने अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात पीडितेचा चेहरा आणि खांद्याचा भाग गंभीररीत्या पोळला आहे.
लंका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदनगर कॉलनीत ही घटना घडली. पीडित तरुणी या भागातील एका घरात गत काही महिन्यांपासून पेइंग गेस्ट म्हणून मुक्कामास होती. यादरम्यान घरमालकाचा मुलगा सिद्धार्थ याच्यासोबत तिची जवळीक निर्माण झाली. सिद्धार्थ हा बनारस हिंदू विद्यापीठात संगीताचा विद्यार्थी आहे. पीडित तरुणीने अलीकडे मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे सिद्धार्थ नाराज होता. याच मुद्यावर त्यांच्यात वाद झाला आणि संतापाच्या भरात सिद्धार्थने तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला केला. तरुणीचा किंचाळण्याचा आवाज ऐकून सिद्धार्थची आई घटनास्थळी धावली. तिनेच तरुणीला रुग्णालयात भरती केले. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून सिद्धार्थ तूर्तास फरार आहे.

Web Title: Russian acid attack acid attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.