भारतात दरवर्षी होणार Sputnik V लसीच्या ८५ कोटी डोसचं उत्पादन; सिंगल डोस लसही लवकरच येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 02:34 PM2021-05-16T14:34:10+5:302021-05-16T14:37:43+5:30
Russian Coronavirus Vaccine Sputnik V : सिंगल शॉट लस स्पुटनिक लाईटही लवकरच भारतात येणार असल्याची कंपनीची माहिती.
सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत देशात मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, रशियाकडून Sputnik V या लसीची दुसरी खेप रविवारी भारतात दाखल झाली. सध्या देशात नागरिकांना कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या लसी देण्यात येत आहे. येत्या आठड्यापासून Sputnik V ही लसदेखील बाजारात उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा - अदर पूनावालांचे वडील सायरस पूनावालाही लंडनमध्ये; पाहा देश सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणाले...
यादरम्यान भारतातीलरशियाचे राजदूत एन. कुदाशेव (N. Kudashev) यांनी वृत्तसंस्था ANI बोलताना ही एक रशियन-भारतीय लस (Russian-Indian vaccine) असल्याचं म्हटलं. हळहळू भारतात या लसीचं उत्पादन वाढवून ८५ कोटी डोस प्रति वर्ष करण्यात येईल. तसंच भारतात लवकरच Sputnik V ची सिंगल डोस लस स्पुटनिक लाईट (Sputnik Lite) आणली जाणार असल्याचंही कुदाशेव म्हणाले.
#WATCH | N Kudashev, Russian Ambassador to India to ANI says, "Sputnik V is Russian-Indian vaccine. We expect that its production in India will be gradually increased up to 850 million doses per year... There are plans to introduce single-dose vaccine soon in India-Sputnik Lite." pic.twitter.com/IW5Kb8LrE0
— ANI (@ANI) May 16, 2021
"भारतात लसीचं उत्पादन तेजीनं वाढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. रशियामध्ये जुलै २०२० पासून लोकांच्या लसीकरणासाठी याच लसीचा वापर करण्यात येत आहे. ही लस तिच्या प्रभावीपणासाठी जगभरात ओळखली जाते. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या विरोधातही ही लस काम करणार असल्याचं रशियाच्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे," असं कुदाशेव म्हणाले.
Telangana: Second consignment of Sputnik V arrives in Hyderabad pic.twitter.com/eEWWhd85YK
— ANI (@ANI) May 16, 2021
९९५ रूपयांना मिळणार एक डोस
स्पुटनिक व्ही (Sputnik V) ची भारतातील किंमत (Indian Price declaired) जाहीर करण्यात आली आहे. रशियातून (Russia) आयात केलेली ही लस भारतात ९९५.४० रुपये प्रति डोस या दरानं मिळणार आहे. डॉ. रेड्डीज ही औषध निर्माता कंपनी रशियाची ही लस भारतात बनविणार असून मेक इन इंडियाची ही लस आणखी स्वस्त मिळण्याची अपेक्षा आहे. (Sputnik V vaccine priced at Rs 995 per dose in India, first shot administered by Dr Reddy's in Hyderabad)