सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत देशात मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, रशियाकडून Sputnik V या लसीची दुसरी खेप रविवारी भारतात दाखल झाली. सध्या देशात नागरिकांना कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या लसी देण्यात येत आहे. येत्या आठड्यापासून Sputnik V ही लसदेखील बाजारात उपलब्ध होणार आहे. हेही वाचा - अदर पूनावालांचे वडील सायरस पूनावालाही लंडनमध्ये; पाहा देश सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणाले...यादरम्यान भारतातीलरशियाचे राजदूत एन. कुदाशेव (N. Kudashev) यांनी वृत्तसंस्था ANI बोलताना ही एक रशियन-भारतीय लस (Russian-Indian vaccine) असल्याचं म्हटलं. हळहळू भारतात या लसीचं उत्पादन वाढवून ८५ कोटी डोस प्रति वर्ष करण्यात येईल. तसंच भारतात लवकरच Sputnik V ची सिंगल डोस लस स्पुटनिक लाईट (Sputnik Lite) आणली जाणार असल्याचंही कुदाशेव म्हणाले.
भारतात दरवर्षी होणार Sputnik V लसीच्या ८५ कोटी डोसचं उत्पादन; सिंगल डोस लसही लवकरच येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 2:34 PM
Russian Coronavirus Vaccine Sputnik V : सिंगल शॉट लस स्पुटनिक लाईटही लवकरच भारतात येणार असल्याची कंपनीची माहिती.
ठळक मुद्देसिंगल शॉट लस स्पुटनिक लाईटही लवकरच भारतात येणार असल्याची कंपनीची माहिती. Sputnik V ची दुसरी खेप हैदराबादमध्ये झाली दाखल.