केंद्राच्या कनिष्ठ पातळीवरील कर्मचा-यांचे वेतन वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:27 AM2018-01-17T02:27:44+5:302018-01-17T02:27:53+5:30
केंद्र सरकारने आपल्या मध्य आणि वरिष्ठ पातळीवरील कर्मचाºयांच्या वेतनात काही बदल न करण्याचा निर्णय घेतला असला तरी ज्या सर्व केंद्रीय कर्मचा-यांचे वेतन
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आपल्या मध्य आणि वरिष्ठ पातळीवरील कर्मचाºयांच्या वेतनात काही बदल न करण्याचा निर्णय घेतला असला तरी ज्या सर्व केंद्रीय कर्मचा-यांचे वेतन मॅट्रिक्स लेव्हल फाईव्हच्या खाली आहे त्यांना ते वाढवून देण्याच्या प्रस्तावावर विचार केला जात आहे.
सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींच्या पुढे जाऊन केंद्र सरकार आपल्या सगळ्या कर्मचाºयांचे वेतन पे मॅट्रिक्स फाईव्हपर्यंत वाढवून देण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहे, असे अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्याने याबाबतीतील कोणतेही तपशील (वेतन नेमके किती वाढेल) देण्यास नकार दिला. सरकारला या वेतनवाढीमुळे किती आर्थिक ओझे पेलावे लागेल व किती कर्मचाºयांना वेतन वाढवून द्यावे लागेल यावर काम करीत आहे. अजून अंतिम निर्णय झालेला नाही. तथापि, कर्मचाºयांच्या संघटनेने जी मागणी केली आहे तिच्या जवळ ते जाणारे असेल, असे हा अधिकारी म्हणाला. येत्या काही आठवड्यांत हा विषय अधिक स्पष्ट होईल. पे मॅट्रिक्स फाईव्हच्या वर असलेल्या मध्यम आणि वरिष्ठ पातळीवरील कर्मचाºयांच्या वेतनात मात्र काही बदल होणार नाही. अर्थमंत्रालयाची अशी भूमिका आहे की, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार या कर्मचाºयांना चांगली वेतनवाढ मिळालेली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाºयांसाठी सातव्या वेतन आयोगाने मूळ वेतनात १४.२७ टक्के वाढीची शिफारस आहे.