सलमान खान कैदी नंबर 106, तुरुंगातील जेवण नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 08:52 PM2018-04-05T20:52:34+5:302018-04-05T20:52:34+5:30
सलमान खानला तुरुंगातील कैदी नंबर 106 देण्यात आला असून बराक क्र. 2 मध्ये ठेवण्यात येणार आहे.
जोधपूर : 1998च्या काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, त्याची रवानगी जोधपूरच्या तुरुंगात करण्यात आली आहे. दरम्यान, सलमान खानला तुरुंगातील कैदी नंबर 106 देण्यात आला असून बराक क्र. 2 मध्ये ठेवण्यात येणार आहे.
जोधपूर तुरुंगाचे डीआयजी विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानला जेलमध्ये कैदी नंबर 106 देण्यात आला आहे. त्याला तुरुंगातील ड्रेस उद्या देण्यात येणार आहे. तसेच, सलमान खाने तुरुंगातले जेवण नाकारले आहे. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे, असेही ते म्हणाले. याचबरोबर, सलमान खाने अजून ड्रेस बदललेला नाही. तो अजून आज घातलेल्याच कपड्यांवर आहे. सध्या त्याने कोणतीही मागणी केलेली नाही. त्याला विशेष सुरक्षेत ठेवण्यात आले आहे, असे विक्रम सिंह यांनी सांगितले.
#SalmanKhan has been given number 106 & is lodged in Ward number 2. He was made to undergo medical test & has no medical issues. He hasn't made any demands. We'll give him jail uniform tomorrow. Multiple-layer security has been put up for his ward: Vikram Singh, Jodhpur DIG(Jail) pic.twitter.com/MTjY7PlVRj
— ANI (@ANI) April 5, 2018
1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने गुरुवारी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरवले. या प्रकरणी न्यायालयाने त्याला पाच वर्षांचा तुरूंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालानंतर सलमान खान याला जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये नेण्यात येणार असून आज त्याला जामीन मिळण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे किमान आजचा दिवस तरी सलमान खानला तुरूंगातच काढावा लागणार आहे. हा निकाल सलमान खानसाठी मोठा झटका मानला जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील सहआरोपी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.