...म्हणून उत्तराखंडमध्ये उर्दूऐवजी संस्कृतमध्ये लिहिली जाणार रेल्वे स्थानकांची नावं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 12:51 PM2020-01-20T12:51:27+5:302020-01-20T13:11:29+5:30
रेल्वेने उत्तराखंडमध्ये असणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकांची नावं उर्दूऐवजी संस्कृतमध्ये लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.
डेहरादून - भारतीय रेल्वेने उत्तराखंडमध्ये असणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकांची नावं उर्दूऐवजी संस्कृतमध्ये लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकावरील नावांच्या फलकामधील उर्दू भाषेतील नावाचा उल्लेख हा आता संस्कृत भाषेत केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या रेल्वे फलाटावरील फलकांवर रेल्वे स्थानकाचे नाव हे हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत लिहिलेलं आहे. मात्र आता रेल्वे प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानंतर हिंदी, इंग्रजी आणि संस्कृतमध्ये नावं दिसणार आहेत.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिेलेल्या माहितीनुसार, संस्कृत ही राज्याची दुसरी अधिकृत भाषा असल्याने हा बदल करण्यात आला आहे. 2010 मध्ये संस्कृत ही उत्तराखंडची दुसरी अधिकृत भाषा झाली आहे. रमेश पोखरियाल निशंक यांनी संस्कृत ही राज्याची दुसरी अधिकृत भाषा असल्याची घोषणा केली होती. राज्यामध्ये संस्कृत भाषेचा प्रचार करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली होती. उत्तराखंडनंतर 2019 मध्ये हिमाचल सरकारने देखील संस्कृत भाषा ही राज्याची दूसरी राजभाषा केली आहे.
उत्तर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या नियमावलीत रेल्वे फलाटावरील साईन बोर्डवर रेल्वे स्थानकांची नावं हिंदी आणि इंग्रजीनंतर संबंधीत राज्याच्या दुसऱ्या अधिकृत भाषेत लिहिली जायला हवीत असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता उत्तराखंडची दुसरी अधिकृत भाषा ‘संस्कृत’ असल्याने रेल्वे स्थानकांवरील फलकांमध्ये हिंदी, इंग्रजी आणि उर्दूऐवजी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेत स्थानकांची नावं लिहिण्यात येणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Budget 2020: प्रत्येक बजेटआधी हलवा करण्यामागचं 'शास्त्र' तुम्हाला माहीत आहे का?
साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरीमध्ये वादंग; काय आहेत या मागची आर्थिक गणितं?
शिवसेनेच्या 'त्या' प्रस्तावाबाबत राष्ट्रवादीशी चर्चा नाही; २०१४ मध्येच होणार होती महाविकास आघाडी?
3500 किलोमीटर दूरवर हवेतच नेस्तनाबूत होणार शत्रूचं विमान, K-4 बॅलिस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी
छत्रपती शिवरायांनाही जिंकता आला नव्हता असा 'हा' अजिंक्य किल्ला; काय आहे यामागचं रहस्य?