SBI Clerk Recruitment 2021, Sarkari Naukri 2021: देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मोठी भरती काढली आहे. बँकेत नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी हा सुवर्णसंधी आहे. एसबीआयने क्लार्कच्या 5237 पदांवर (SBI Clerk Recruitment 2021) भरती आयोजित केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2021 म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे. (SBI Clerk Notification 2021 Out for 5454 Junior Associates Posts.)
एसबीआयची अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर याची माहिती आहे. यामध्ये ज्युनिअर असोसिएट या जागा भरल्या जाणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया क्लार्क भरती 2021 नुसार ज्युनिअर असोसिएटच्या 5237 जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 17 मे 2021 आहे.
महत्वाच्या तारखा...अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 27 एप्रिल 2021 अर्ज करण्याची अंतिम तारीख - 17 मे 2021परिक्षा पूर्व ट्रेनिंग कॉल लेटर - 26 मे 2021प्रीलिमिनरी परिक्षा - जून 2021मुख्य परिक्षा - 31 जुलै, 2021
शिक्षणाची अटकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांकडे 01 जानेवारी 2021 च्या आधीचे integrated dual degree (IDD) प्रमाणपत्र आहे ते अर्ज करू शकतात. तसेच जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत, ते अर्ज करू शकतात.
वयाची अटएसबीआय भरतीला वयाची अट 1 एप्रिल 2021 नुसार कमीत कमी 20 आणि जास्तितजास्त 28 वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच आरक्षणानुसार वयाची अट शिथिल केली जाणार आहे. यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन पहावे लागणार आहे.
निवड प्रक्रिया...सुरुवातीला एक ऑनलाईन आणि नंतर मुख्य परिक्षा (SBI Preliminary & Main exam) घेण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक भाषेची निवड करता येणार आहे. 100 अंकांची पहिली परिक्षा असणार आहे. एक तासाची ही परिक्षा असणार असून इंग्रजी, गणित आणि तर्क क्षमतेवर आधारित असणार आहे.
अर्ज शुल्कभरतीचे अर्ज शुल्क सामान्य आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी 750 रुपये ठेवण्यात आले आहे. तर आरक्षणातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
SBI Clerk Recruitment 2021 चे नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा...