SBI Recruitment 2020: अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस; SBI मध्ये शेकडो पदांवर भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 10:02 AM2021-01-11T10:02:18+5:302021-01-11T10:04:33+5:30

Government Bank Jobs: बँकेने सर्व विभागातील वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची पहिली प्रिलिम्स परीक्षा फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. याच्या तारखा लवकरच जाहीर करण्य़ात य़ेणार आहेत. 

SBI Recruitment 2020: Last day to apply; How to apply in SBI for 480 posts | SBI Recruitment 2020: अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस; SBI मध्ये शेकडो पदांवर भरती

SBI Recruitment 2020: अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस; SBI मध्ये शेकडो पदांवर भरती

Next

SBI SO Recruitment 2020, Sarkari Naukri Job 2020: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध असून अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या भरतीमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरच्या रिक्त असलेल्या 452 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. ११ जानेवारीपर्यंत उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. 

बँकेने सर्व विभागातील वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची पहिली प्रिलिम्स परीक्षा फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. याच्या तारखा लवकरच जाहीर करण्य़ात य़ेणार आहेत. 

शैक्षणिक अट
मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्टॅटिक्स किंवा गणित किंवा अर्थशास्त्रामध्य़े पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असायला हवी. यामध्ये ६० टक्क्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. MBA, MGDM आणि BTech पदवी असलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. 
मॅनेजर पदासाठी वयोमर्यादा 25 ते 45 वर्षे आहे. डेप्युटी मॅनेजर पदासाठी 21 ते 35 वर्षे आहे. तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी 28 ते 30 वर्षे आहे. इंजिनिअर पदांसाठी 40 वर्षे आहे. यासाठी 23 हजार ते 51 हजार रुपये एवढा पगार दिला जाणार आहे. 

कोणत्या पदांवर भरती....

  • एसबीआयने मॅनेजर व डेप्युटी मॅनेजर मार्केटिंगमध्ये 38 जागांसाठी भरती काढली आहे. 
  • मॅनेजर क्रेडिट प्रोसिजर्सच्या दोन पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 
  • असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर आणि अन्य अशा 236 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये आयटी सिक्युरिटी एक्सपर्ट, प्रोजेक्ट मॅनेजर, अॅप्लिकेशन आर्किटेक्ट आणि टेक्निकल लीड या पदांसाठीही अर्ज मागविण्यात आले आहेत. 
  • एसबीआयने जाहिरात क्रमांक CRPD/SCO/2020-21/29 जारी करत 100 असिस्टंट मॅनेजर (सिक्यूरिटी एनॅलिस्ट) आणि डेप्युटी मॅनेजर (सिक्यूरिटी एनॅलिस्ट) या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. 
  • नेटवर्क सिक्यूरिटी स्पेशलिस्टसाठी मॅनेजर आणि नेटवर्क राउटिंग अँण्ड स्विचिंग स्पेशलिस्टसाठी मॅनेजर अशा 32  पदांसाठी अर्ज मागविले आहेत. 
  • इंटर्नल ऑडिटसाठी CRPD/SCO/2020-21/31 द्वारे डेप्युटी मॅनेजरच्या 28 पदांसाठी अर्ज मागविले आहेत. 
  • एसबीआयने इंजिनिअर फाय़रसाठी 16 जागांवर अर्ज मागविले आहेत. 

 

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा...

 

SSC CGL Notification 2020: केंद्र सरकारच्या या विभागात नोकरीची संधी, ६ हजार ५०६ पदांसाठी निघालीय भरती

स्टाफ सिलेक्शन कमिटी (एसएससी) ने एसएससी सीजीएल २०२० साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. त्याबरोबरच एसएससी-सीजीएल परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी परीक्षेची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार एसएससी सीजीएल २०२० च्या टीयर १ ची परीक्षा २९ मे पासून ७ जून २०२१ दरम्यान आयोजित होणार आहे.

ही परीक्षा संगणकावर आधारित असेल. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळ असलेल्या ssc.nic.in  वर देण्यात आलेल्या अधिकृत नोटिफिकेशनच्या आधारावर अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीख ३१ जानेवारी २०२१ निर्धारित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील एकूण सहा हजार ५०६ पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रुप बीमधील गॅझेटेड श्रेणीतील २५० पदे, ग्रुप बीमध्ये नॉन गॅझेटेड श्रेणीची ३ हजार ५१३ पदे आणि ग्रुप सी मधील २ हजार ७४३ पदांची भरती होणार आहे.

Web Title: SBI Recruitment 2020: Last day to apply; How to apply in SBI for 480 posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.