School: आश्चर्यच! या शाळेत घेतली जात नाही कुठलीही फी, उलट विद्यार्थ्यांनाच मिळतात लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 12:23 PM2023-03-06T12:23:45+5:302023-03-06T12:27:37+5:30

School: आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी शिक्षण ह मोफत दिले जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा शाळेबाबत सांगणार आहोत जिथे अनेक प्रकारच्या सोईसुविधा विद्यार्थ्यांना मोफत पुरवल्या जातात.

School: Surprise! No fee is charged in this school, on the contrary students get lakhs of rupees | School: आश्चर्यच! या शाळेत घेतली जात नाही कुठलीही फी, उलट विद्यार्थ्यांनाच मिळतात लाखो रुपये

School: आश्चर्यच! या शाळेत घेतली जात नाही कुठलीही फी, उलट विद्यार्थ्यांनाच मिळतात लाखो रुपये

googlenewsNext

आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी शिक्षण ह मोफत दिले जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा शाळेबाबत सांगणार आहोत जिथे अनेक प्रकारच्या सोईसुविधा विद्यार्थ्यांना मोफत पुरवल्या जातात. खरोखरच इथे शिकणारे विद्यार्थी हे भाग्यवान म्हणावे लागतील. या शाळेमधील विद्यार्थ्यांकडून कुठलंही शुल्क आकारलं जात नाही. उलट शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार १ ते ६ लाखांपर्यंतची रक्कम दिली जाते.

या शाळेचं नाव श्रीमद यशोविजयजी जैन संस्कृत पाठशाळा असं आहे. ही गुजरातमधील मेहसाणा येथील १२५ वर्षे जुनी संस्था आहे. या शाळेतील पहिले विद्यार्थी योगनिष्ठ श्रीबुद्धिसागर सुरीश्वर महाराज होते. त्यांनीच ऑक्टोबर १८९७ मध्ये या शाळेची स्थापना केली. आतापर्यंत येथून २ हजार ८५० विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केलं आहे. येथील विद्यार्थी गुजरातसोबत तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये स्थायिक झाले आहे. 

संस्थानामधील प्रकाशभाई पंडित यांनी सांगितले की, या शाळेमध्ये दरवर्षी ३० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. विद्यार्थ्यांचे आई-वडील किंवा नातेवाईकांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. शिक्षणादरम्यान संस्थान विद्यार्थ्यांना दरमहा ५ हजार रुपये देते. चार वर्षांचं शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना १ लाख आणि सह वर्षांचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन लाख रुपये दिले जातात.

कायदा आणि व्याकरणासह विशेष अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ लाख रुपये दिले जातात. अनेक विद्यार्थ्यांना ६ लाख रुपयांपर्यंत रक्कम दिली जाते. विद्यार्थ्यांना सर्वप्रकारचं ज्ञान मिळावं यासाठी येथे १२ हजार पुस्तकं असलेलं ग्रंथालयसुद्धा आहे. या शाळेमध्ये धार्मिक शिक्षणासह इंग्रजी, संगणक आणि संगीताचंही शिक्षण दिलं जातं. येथील विद्यार्थी देशातील इतर शाळांप्रमाणे अभ्यासक्रमाचा अभ्यास करू शकतात. येथे शिक्षण घेण्यासाठी कुणीही पोहोचू शकतात.

१३ कोटी रुपये खर्चुन नव्या जैन संस्कृत स्कूलची बांधणी करण्याचं काम सुरू आहे. ते मेहसाणा-अहमदाबाद महामार्गावर लिंच गावाजवळ बनवण्यात आलं आहे. या शाळेमध्ये १०० विद्यार्थ्यांना आरामात प्रवेश घेता येईल. येथील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार पुस्तके आणि टुल्स उपलब्ध असतील. नव्या परिसरामध्ये शाळेच्या इमारतीसह, वसतीगृह आणि कँटिनसारख्या सुविधा उपलब्ध असतील. परिसरामध्ये जैन मंदिराची बांधणी केली जाईल. तसेच मुनीजनांसाटी वेगळं वसतीगृह बांधलं जाईल.  

Web Title: School: Surprise! No fee is charged in this school, on the contrary students get lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.