बंगळुरूमध्ये स्फोटात शास्त्रज्ञ ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 05:23 AM2018-12-06T05:23:23+5:302018-12-06T05:23:33+5:30
इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या प्रयोगशाळेत बुधवारी झालेल्या स्फोटात स्टार्ट-अप कंपनीचा एक शास्त्रज्ञ मरण पावला, तर तीन जण गंभीर जखमी झाले.
बंगळुरू : येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या प्रयोगशाळेत बुधवारी झालेल्या स्फोटात स्टार्ट-अप कंपनीचा एक शास्त्रज्ञ मरण पावला, तर तीन जण गंभीर जखमी झाले.
संस्थेतील एरोस्पेस विभागातील हायपरसोनिक व शॉकवेव्ह या विषयाच्या प्रयोगशाळेत दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी ही दुर्घटना घडली. त्यात मरण पावलेल्या शास्त्रज्ञाचे नाव मनोजकुमार असे आहे. हा सिलेंडरचा स्फोट असावा असे सांगण्यात आले. सुपर-वेव्ह टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कर्मचारी असलेले चार शास्त्रज्ञ इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समध्ये संशोधन करत होते.
या स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याच्या हादऱ्याने मनोजकुमार एका भिंतीला आदळला व जागीच ठार झाला. गंभीर जखमी झालेल्या तीन शास्त्रज्ञांमध्ये अतुल्य, कार्तिक, नरेशकुमार यांचा समावेश
आहे. (वृत्तसंस्था)