Covishield चा दुसरा डोस आता १२-१६ व्या आठवड्यादरम्यान; केंद्रानं मंजूर केली वर्किंग ग्रुपची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 07:27 PM2021-05-13T19:27:32+5:302021-05-13T19:29:19+5:30
Corona Vaccine Covishield : वर्किंग ग्रुपची शिफारस केंद्रानं केली मंजूर. १२ ते १६ आठवड्यामध्ये मिळणार लसीचा दुसरा डोस.
Dosage interval for Covishield: देशात कोरोना लसीची प्रचंड टंचाई (Corona Vaccine Shortage) भासू लागली आहे. पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस घेण्यासाठी वारंवार लसीकरण केंद्राच्या (Vaccination centers) चकरा माराव्या लागत आहेत. यामुळे आधी ३० दिवसांत लसीचा दुसरा डोस घेण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु नंतर सरकारनं हा कालावधी ४५ दिवसांवर नेला होता. आता या अंतरात आणखी करण्यात आली आहे. आता नागरिकांना कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस १२ ते १६ आठवड्यांदरम्यान देण्यात येणार आहे. (The immunisation panel has recommended increasing the gap between two doses of Covishield vaccine to 12-16 weeks. No change in dosage interval for Covaxin has been suggested by the panel.) वर्किंग ग्रुपनं केलेल्या शिफारसी सरकारनं मान्य केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं यासंदर्भातील माहिती दिली. दरम्यान, कोवॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसचा कालावधी मात्र वाढवण्यात आला नाही.
ब्रिटनमध्ये उपलब्ध रियल लाईफ एविडन्सच्या आधारे वर्किंग ग्रुपनं कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमध्ये १२ ते १६ आठवड्यांचं अंतर ठेवण्याची शिफारस केली होती. ती सरकारनं मंजूर केली आहे. परंतु कोवॅक्सिनबाबत कोणतीही शिफारस करण्यात आली नव्हती.
Gap between 2 doses of #CovishieldVaccine has been increased to 12-16 weeks from 6-8 weeks currently.
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) May 13, 2021
Decision has been taken based on recommendations given by COVID working group after analysing emerging evidence.@PMOIndia@MoHFW_INDIA#Unite2FightCoronapic.twitter.com/kRbbjxGKSJ
कोवॅक्सिनच्या कालावधीत बदल नाही
केंद्र सरकारची कोरोना सल्लागार समितीने सीरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली ऑक्सफर्डच्या कोविशिल्डचा दुसरा डोस देण्याचा कालावधी वाढविण्याची शिफारस केली होती. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढविण्यास सांगण्यात आलं होतं. सध्या कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर हे चार ते आठ आठवड्यांचं करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचा कालावधी तसाच ठेवण्यात आला आहे. तो चार आठवड्यांचा आहे.
ज्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि जे बरे झाले आहेत त्यांनी देखील लगेचच कोरोना लस घेण्यासाठी धावाधाव करण्याची गरज नसल्याचे या वर्किंग ग्रुपनं म्हटलं आहे. अशा लोकांनी बरं झाल्यापासून सहा महिन्यांनी लस घ्यावी, असं या NTAGI ने सुचविलं होतं. गरोदर असलेल्या महिलांना कोणतीही लस निवडण्याची मुभा आहे. तसंच प्रसुती झाल्यानंतर महिला कधीही लस घेऊ शकतात, असे या त्यांनी नमूद केलं होतं.