Jammu & Kashmir: कलम 370 सरसकट हटवलेलं नाही; हरिश साळवेंनी समजावलं नेमकं काय आहे 'मिशन काश्मीर'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 08:54 PM2019-08-05T20:54:21+5:302019-08-05T20:54:55+5:30

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम 370 हटवण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

Section 370 has not been deleted at all; Harish Salve explained exactly what 'Mission Kashmir' is. | Jammu & Kashmir: कलम 370 सरसकट हटवलेलं नाही; हरिश साळवेंनी समजावलं नेमकं काय आहे 'मिशन काश्मीर'

Jammu & Kashmir: कलम 370 सरसकट हटवलेलं नाही; हरिश साळवेंनी समजावलं नेमकं काय आहे 'मिशन काश्मीर'

Next

नवी दिल्ली - काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम 370 हटवण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. दरम्यान, ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांची कलम 370 बाबत प्रतिक्रिया समोर आली आहे. केंद्र सरकारने कलम 370 सरसकट हटववेले नाही तर त्यातील काही तरतुदी आणि कलम 35 अ हटवले आहे, अशी माहिती साळवे यांनी दिली आहे. 
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना साळवे यांनी सांगितले की, ''कलम 370 सांगते की त्याअंतर्गत असलेल्या तरतुदी राष्ट्रपतींच्या आदेशान्वये लागू केल्या जातील. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारेच कलम 35 अ घटनेत समाविष्ट करण्यात आले होते. आज तोच आदेश रद्द करण्यात आला आहे.''  

 गेली अनेक दशकं चर्चेचा, वादाचा विषय ठरलेलं, जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं राज्यघटनेतील 'कलम 370' रद्द करण्याची, त्यातील काही वादग्रस्त तरतुदी वगळण्याची ऐतिहासिक शिफारस केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज 370 कलमासंदर्भतील दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केलं आहे. तसंच, जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचे विधेयक सभागृहात ठेवण्यात आले.

काय आहे कलम 370 ?
तत्कालीन राष्ट्रपतींच्या आदेशावरून 1954मध्ये 35-ए कलमाचा संविधानात समावेश करण्यात आला. कलम 35-एची अंमलबजावणी करण्यासाठी तत्कालीन सरकारनं कलम 370चा वापर केला होता. कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरला आधीच विशेष राज्याचा दर्जा प्राप्त होता. पण कलम 35Aमुळे जम्मू-काश्मीरच्या राज्य सरकारला स्वतःचं संविधान आणि काही विशेष कायदे बनवण्याचे अधिकार देण्यात आले. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. तसेच राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभसुद्धा मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीत संधी दिली जात नाही.  या विशेष अधिकारामुळे राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचादेखील अधिकार नाही.

तसेच कलम 370मधील तरतुदीअंतर्गत संसदेला जम्मू-काश्मीरसाठी फक्त संरक्षण, विदेश आणि दळणवळणाशी संबंधित प्रकरणांमध्येच कायदा बनवण्याचा अधिकार आहे. या कलमामुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांना त्यांच्या सोयीनुसार त्यांचे हित आणि कायदे निश्चित करण्याचा अधिकार मिळतो. केंद्र सरकारच्या दबावातून मुक्त होऊन ते स्वत:साठी आपल्या गरजांनुसार कायदा तयार करू शकतात. या कायद्यांतर्गत इतर राज्यातील लोकांना जम्मू-काश्मीरात नोकरी मिळवण्याचा अधिकार नाही. राज्याच्या शासकीय सेवादेखील केवळ जम्मू-काश्मीरच्या उमेदवारांसाठीच आहेत. यामुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी सुरक्षित राहतात.  

Web Title: Section 370 has not been deleted at all; Harish Salve explained exactly what 'Mission Kashmir' is.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.