श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या अवंतीपूरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. मंगळवारी (21 जानेवारी) या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर एक जवान आणि एक पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अवंतीपूरामध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. चकमकीत एक जवान आणि एक पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
काश्मीरमधील शोपियानच्या वाची भागात सोमवारी (20 जानेवारी) चकमक झाली होती. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यापूर्वी 12 जानेवारी रोजी पुलवामा येथील त्राळ येथे झालेल्या चकमकीदरम्यान जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारले होते. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर हमाद खानचा समावेश होता. हमादचा खात्मा हे सुरक्षा दलाचे मोठे यश होते.
महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! नेपाळच्या रिसॉर्टमध्ये सापडले केरळच्या 8 पर्यटकांचे मृतदेह
'पुस्तक झालं आता व्हिडीओ आला'; छत्रपती संभाजीराजे संतापले
तुकडे तुकडे गँग अस्तित्वातच नाही, मोदी सरकारचा खुलासा
Delhi Election : ...म्हणून केजरीवालांना दाखल करता आला नाही उमेदवारी अर्ज
Video: मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; ट्वविटरवरील 'त्या' व्हिडीओमुळे संताप
आंध्र प्रदेशच्या आता तीन राजधान्या, देशातील पहिलाच प्रयोग