मुंबई: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या कोरोना लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाल्यानंतर दोन्ही संस्थांकडून एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीका होत होती. लसीची परिणामकारकता आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही संस्था एकमेकांना लक्ष्य करत होत्या. मात्र आता या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. दोन्ही संस्थांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत याबद्दलची माहिती दिली आहे.भारताला आणि जगाला कोरोनावरील लसी लवकर उपलब्ध व्हाव्यात यासाठी दोन्ही कंपन्या एकत्रितपणे काम करतील, अशी माहिती संयुक्त निवेदनातून देण्यात आली आहे. 'भारताला आणि जगाला कोरोनावरील लसी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक कटिबद्ध आहे,' असं दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात नमूद केलं आहे. दोन्ही कंपन्या एकत्र येऊन लसीच्या उत्पादन आणि वितरणावर काम करतील, असा इरादादेखील निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.
आमचं लक्ष्य एकच! सीरम, भारत बायोटेककडून वादावर पडदा; संयुक्त निवेदन प्रसिद्ध
By कुणाल गवाणकर | Published: January 05, 2021 3:43 PM