काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये काही दिवसांपासून प्रचंड बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच कुपवाडामधील माछिल सेक्टरमध्ये हिमस्खलन झाले आहे. या दुर्घटनेत लष्कराचे तीन जवान शहीद झाले असून एक जवान बेपत्ता आहे. तर दुसरीकडे खोऱ्यात हिमस्खलनात पाच लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते. सुत्रांच्या माहितीनुसार, रामपूर आणि गुरेज सेक्टरमध्ये हिमस्खलनाच्या अनेक घटना घडल्याची माहिती आहे.
लष्कराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 48 तासांत झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी हिमस्खलन झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये 3 जवान शहीद झाले असून एक जवान अद्याप बेपत्ता आहे. तर हिमस्खलनात अडकलेल्या अनेक जवानांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
याशिवाय, काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात सोनमर्गच्या गग्गेनेर भागाजवळ कुलान गावात हिमस्खलन झाले. यात 5 लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक घरं क्षतिग्रस्त झाली आहेत. दरम्यान, लष्कराच्या जवानांनी या परिसरात बचाव अभियान सुरु केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात
दीपिका पदुकोणने माझ्यासारखा सल्लागार नियुक्त करावा, योगगुरू रामदेव बाबांचा सल्ला
ड्रोन वापरता? 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करा; अन्यथा...
Delhi Elections : 'आप' विरोधात भाजपाचा 500 कोटींचा दावा
'आज के शिवाजी' पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना- शिवसेना