Oxygen Shortage: ऑक्सिजन खूप कमी आहे, रुग्ण वाचणार नाहीत; रुग्णालयाच्या CEO ना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 07:35 PM2021-04-22T19:35:29+5:302021-04-22T19:36:34+5:30

Oxygen Shortage: दिल्लीतील एका रुग्णालयाचे सीईओ सुनील सागर यांना तर ऑक्सिजनच्या तुटवड्याने रडू कोसळले.

shanti mukund hospital in delhi faces oxygen shortage and ceo get emotional | Oxygen Shortage: ऑक्सिजन खूप कमी आहे, रुग्ण वाचणार नाहीत; रुग्णालयाच्या CEO ना अश्रू अनावर

Oxygen Shortage: ऑक्सिजन खूप कमी आहे, रुग्ण वाचणार नाहीत; रुग्णालयाच्या CEO ना अश्रू अनावर

googlenewsNext
ठळक मुद्देदिल्लीतील रुग्णालयाच्या CEO ना अश्रू अनावरसरकारने तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करावाकाही रुग्णालयातील ऑक्सिजन पूर्णपणे संपला

नवी दिल्ली: देशभरात दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत असताना, कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. देशाची राजधानी दिल्लीतही परिस्थिती बिकट आहे. अशातच दिल्लीतील एका रुग्णालयाचे सीईओ सुनील सागर यांना तर ऑक्सिजनच्या तुटवड्याने रडू कोसळले. (shanti mukund hospital in delhi faces oxygen shortage and ceo get emotional)

दिल्लीतील शांती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सागर यांनी ऑक्सिजनच्या बिकट परिस्थितीबाबत माहिती दिली. मात्र, यासंदर्भात बोलत असताना त्यांच्या मर्यादेचा बांध फुटला आणि अश्रू अनावर झाले. खूप बिकट स्थिती आहे. आमच्याकडे ऑक्सिजनचा खूप कमी साठा शिल्लक आहे. शक्य आहे त्यांना डिस्चार्ज देण्यास आम्ही डॉक्टरांना सांगितले आहे. आमच्याकडे फक्त २ तासांचाच ऑक्सिजन उरला आहे, असे सागर यांनी सांगितले.

सरकारने तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करावा

सरकारने तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी कळकळीची विनंती एका रुग्णाच्या मुलाने केली आहे.  दिल्लीतील शांती मुकुंद हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यास रुग्णांना डिस्चार्ज देणार नाही, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. अजूनही रुग्णांच्या नातेवाईकांना बेड्ससाठी रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. अनेक रुग्णांना बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

PM मोदींच्या वाराणसीत १० तास पुरेल एवढाच ऑक्सिजन; नवे रुग्ण दाखल करण्यास मनाई

काही रुग्णालयातील ऑक्सिजन पूर्णपणे संपला

राजधानीतील काही हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन पूर्णपणे संपला आहे. आता आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही. काही राज्ये दिल्लीच्या वाट्याच्या ऑक्सिजनवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. 

खोटे उत्सव, पोकळ भाषण नको, देशासाठी उपाययोजना करा; राहुल गांधींची मोदींवर टीका

दरम्यान, राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. घरी विलगीकरणात आहे आणि सतत वाईट बातम्या येत आहेत. भारतात संकट केवळ कोरोनाचे नाही, केंद्र सरकारचे धोरण जनतेविरोधातील आहे. खोटे उत्सव व पोकळ भाषण नाही, देशाला तोडगा द्या, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
 

Web Title: shanti mukund hospital in delhi faces oxygen shortage and ceo get emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.