बंगळुरू : इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना ३,७०० कोटी रुपये किमतीचे ५० दशलक्ष समभाग वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगिरीनुसार कर्मचा-यांना समभाग दिले जाणार आहेत.सूत्रांनी सांगितले की, इन्फोसिसमध्ये कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढून १७ ते २० टक्के झाले आहे. ही गळती थांबविण्यासाठी कंपनीने कर्मचाºयांना समभाग वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘इन्फोसिस एक्स्पांडेड स्टॉक ओनरशिप प्रोग्राम २०१९’ या योजनेतहत कंपनी समभाग वितरित करणार आहे. ही योजना दीर्घकालीन कर्मचारी प्रोत्साहन लाभ आणि भागधारक मूल्यनिर्मिती याच्याशी निगडित आहे. त्याअंतर्गत ५० दशलक्ष समभाग कर्मचाºयांना वितरित केले जातील. वितरित होणारे समभाग कंपनीच्या एकूण समभागांच्या १.१५ टक्का आहे. समभाग वितरित करताना कामगिरीचे आव्हानात्मक निकष लावले जातील. कंपनीने म्हटले की, समभाग वितरण कार्यक्रम कंपनीतील गुणवत्ताशाहीवर (मेरिटोक्रॅसी) उभा करण्यात आला आहे. कंपनीचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती यांनी ही व्यवस्था उभी केली आहे. या उपक्रमातून कर्मचाºयांचा संपत्ती निर्मितीतील सहभाग वाढेल.कंपनीने म्हटले की, हे समभाग कर्मचा-यांना सात वर्षांच्या काळात वितरित केले जातील. आव्हानात्मक कामगिरी निकषात सापेक्ष एकूण समभागधारक परताव्याचा (टीएसआर) समावेश आहे. देशांतर्गत आणि जागतिक निकषांवर टीएसआर मोजला जाणार आहे. एकूण महसूल आणि डिजिटल महसूल यांतील वृद्धी आणि परिचालन लाभ हे निकषही लावण्यात येणार आहेत.
इन्फोसिस कर्मचाऱ्यांना देणार ३,७०० कोटी रुपयांचे समभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:19 AM