Shashi Tharoor : पुरुष खासदारांसह फोटो शेअर करत शशी थरुर म्हणाले, "आता हा व्हायरल होणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 10:30 AM2021-12-01T10:30:24+5:302021-12-01T10:32:47+5:30
Shashi Tharoor : काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे कायमच आपल्या ट्वीट्समुळे चर्चेत असतात.
काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) हे कायमच आपल्या ट्वीट्समुळे चर्चेत असतात. थरूर यांनी सोमवारी महिला खासदारांसोबत ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये महिला खासदारांसह ते हसताना दिसत आहेत. परंतु त्यांनी या फोटोसोबत त्यांनी दिलेल्या कॅप्शनवरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर थरूर यांना माफीही मागावी लागली होती. यानंतर आता त्यांनी पुरुष खासदारांसोबत एक सेल्फी शेअर केला आहे.
दरम्यान, थरूर यांनी महिला खासदारांसह शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनवरून वाद निर्माण झाला होता. "कोण म्हणतं लोकसभा काम करण्यासाठी एक आकर्षक जागा नाही," असं त्यांनी फोटोसह लिहिलं होतं. यानंतर सोशल मीडियावरही त्यांच्या या कॅप्शनवरून निशाणा साधण्यात आला होता. अनेकांनी केलेल्या टीकेनंतर थरूर यांना माफीही मागावी लागली होती.
More comradeship in Parliament as MPs assemble this morning, but no one expects these to go viral…. Though I am an equal-opportunity offender! pic.twitter.com/fOEdgwD6u8
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) November 30, 2021
"फोटोवरून काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या याबाबत आपण माफी मागतो," असं त्यांनी नमूद केलं होतं. महिला खासदारांच्या सांगण्यावरून हा सेल्फी काढण्यात आला होता आणि आनंदी वातावरणात हा फोटो काढण्यात आला. त्यांच्या परवानगीनंतरच हा फोटो ट्वीट केल्याचंही त्यांनी सांगितलं.
Who says the Lok Sabha isn’t an attractive place to work? With six of my fellow MPs this morning: @supriya_sule @preneet_kaur @ThamizhachiTh @mimichakraborty @nusratchirps @JothimaniMP pic.twitter.com/JNFRC2QIq1— Shashi Tharoor (@ShashiTharoor) November 29, 2021
यानंतर त्यानी मंगळवारी पुरूष खासदारांसोबत फोटो शेअर केला. यात त्यानी तीन सेल्फी पोस्ट केले. हे व्हायरल होण्याची आशा नाही, असं त्यांनी कॅप्शन देताना म्हटलं. परंतु यानंतरही काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं.