शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 10:11 AM2024-11-29T10:11:17+5:302024-11-29T10:12:18+5:30
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आता चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या आहेत.
बांगलादेशात चिन्मय कृष्ण दास यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेमुळे मोठा गोंधळ सुरू आहे, दास यांच्या अटकेचे प्रकरण अजूनही थांबताना दिसत नाही. कृष्णा दास हे बांगलादेश सनातन जागरण मंचचे प्रवक्ते आणि चितगाव येथील पुंडरिक धामचे प्रमुख आहेत. बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणाबाबत बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचेही विधान समोर आले आहे. चिन्मय दास यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेख हसीना यांनी लोकांचे धार्मिक स्वातंत्र्य आणि जीवन आणि मालमत्तेची सुरक्षेभाबतही भाष्य केले आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
२८ नोव्हेंबर रोजी एका फेसबुक पोस्टमध्ये बांगलादेश अवामी लीगने चटगावमध्ये वकिलाची हत्या करणाऱ्यांना शिक्षा करण्याबाबत बोलले. माजी पंतप्रधान हसिना यांच्या वतीने पक्षाने लिहिले आहे की, चटगावमध्ये एका वकिलाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येला तीव्र विरोध होत आहे. या खुनात सहभागी असलेल्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना शिक्षा व्हावी. या घटनेमुळे मानवी हक्कांचे घोर उल्लंघन झाले आहे. एक वकील आपली व्यावसायिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी गेला होता. त्याला मारहाण करणारे लोक दहशतवादी आहेत. ते कोणीही असले तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.”
शेख हसीना यांनी आपल्या देशातील जनतेला अशा दहशतवाद आणि अतिरेक्यांच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. शेख हसीना म्हणाल्या, 'सध्याचे सत्ताधारी प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरत आहेत. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी, लोकांच्या जीवनाला सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरले. सर्वसामान्य जनतेवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे होत असलेल्या या अत्याचारांचा मी तीव्र निषेध करतो, असंही शेख हसीना म्हणाल्या.
चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेबाबत शेख हसीना यांनी लिहिले, “सनातन धर्म समाजाच्या एका सर्वोच्च नेत्याला अन्यायकारक अटक करण्यात आली आहे, त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी. चटगावमध्ये एक मंदिर जाळण्यात आले आहे. पहिल्यांदा मशिदी, देवस्थान, चर्च, मठ आणि अहमदिया समुदायाच्या घरांवर हल्ले, तोडफोड, लुटमार आणि आग लावण्यात आली. धार्मिक स्वातंत्र्य आणि सर्व समाजातील लोकांच्या जीवित आणि मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे, असंही शेख हसीना म्हणाल्या.
हिंदू मंदिरांच्या तोडफोडीवर भारत सरकारनेही विधान केले आहे. दरम्यान, बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारतानेही वक्तव्य केले आहे. मंदिरांच्या तोडफोडीच्या घटनांबाबत २८ नोव्हेंबर रोजी राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह म्हणाले, “गेल्या काही महिन्यांत बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरे आणि देवतांची विटंबना आणि नुकसानीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा घटनांबाबत भारत सरकारने चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये ढाक्याच्या तंटीबाजारमधील पूजा मंडपावर हल्ला आणि दुर्गा पूजा दरम्यान सातखीरा येथील जेशोरेश्वरी काली मंदिरातील चोरीचा समावेश आहे. "सरकारने बांगलादेश सरकारला हिंदू आणि सर्व अल्पसंख्याक आणि त्यांची प्रार्थनास्थळे यांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.