धक्कादायक ! गुजरातमध्ये ७१ दिवसांत १,२३,८७१ डेथ सर्टिफिकेट्स; पण कोरोनाबळींचा 'सरकारी' आकडा ४,२१८

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 03:04 PM2021-05-14T15:04:49+5:302021-05-14T16:28:19+5:30

गुजरातमधील 1 मे ते 10 मेपर्यंतच्या मृत्यू प्रमाणपत्राची माहिती घेतल्यास धक्कादायक आकडेवाडी समोर आली आहे. त्यानुसार, राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये 71 दिवसांत 1 लाख 23 हजार 871 जणांचा मृत्यू झाला आहे.

Shocking! In Gujarat, 1 lakh 23 thousand people died in 71 days | धक्कादायक ! गुजरातमध्ये ७१ दिवसांत १,२३,८७१ डेथ सर्टिफिकेट्स; पण कोरोनाबळींचा 'सरकारी' आकडा ४,२१८

धक्कादायक ! गुजरातमध्ये ७१ दिवसांत १,२३,८७१ डेथ सर्टिफिकेट्स; पण कोरोनाबळींचा 'सरकारी' आकडा ४,२१८

googlenewsNext
ठळक मुद्देगुजरातमधील 1 मे ते 10 मेपर्यंतच्या मृत्यू प्रमाणपत्राची माहिती घेतल्यास धक्कादायक आकडेवाडी समोर आली आहे. त्यानुसार, राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये 71 दिवसांत 1 लाख 23 हजार 871 जणांचा मृत्यू झाला आहे.

सुरत - गुजरातमध्ये कोरोना महामारीचं मोठं संकट उभारलं असून राज्यातील मृत्यूदरात मोठी वाढा झाली आहे. अहमदाबाद, सूरत, राजकोट, भावनगर, जामनगर यांसारख्या जिल्ह्यात परिस्थिती विदारक बनली आहे. शवगृहात मृतदेहांची रांग लागली असतानाही सरकारकडून मृतांचा खरा आकडा लपविण्यात येत आहे. दैनिक भास्करने येथील मृतांच्या आकडेवाडीसंदर्भात वृत्त दिले आहे. 

गुजरातमधील 1 मे ते 10 मेपर्यंतच्या मृत्यू प्रमाणपत्राची माहिती घेतल्यास धक्कादायक आकडेवाडी समोर आली आहे. त्यानुसार, राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये 71 दिवसांत 1 लाख 23 हजार 871 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सरकारी आकडेवाडीनुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या केवळ 4218 एवढीच आहे. त्यामुळे, 71 दिवसांत सव्वा लाख लोकांचा जीव कसा गेला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

राज्यातील डेथ सर्टिफिकेटच्या आकडेवाडीनुसार यंदाच्या मार्च महिन्यातच 26,026, एप्रिल महिन्यात 57,796 आणि मे महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसांत 40,051 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या 2020 च्या आकडेवारीसोबत याची तुलना केल्यास मोठी तफावत जाणवत आहे. मार्च 2020 मध्ये 23,352, एप्रिलमध्ये 21,591 आणि मे 2020 मध्ये 13,125 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 71 दिवसांत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दुप्पट आहे, असे दैनिक भास्करने आकडेवाडीनुसार स्पष्ट केले आहे. 

80 टक्के मृत्यू हायपरटेंशनने

डॉक्टर्स आणि रुग्णांच्या नातेवाईंकांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च ते 10 मे पर्यंत जे मृत्यू झाले, त्यामध्ये 80 टक्के रुग्ण हे इतरही आजारांनी ग्रस्त होते. राज्यात सर्वाधिक 38 टक्के मृत्यू हे हायरपरटेंशनमुळेच झाले आहेत. तर, 28 टक्के कोरोनाबाधितांना किडनी, डायबेटीज, शुगर, लीव्हरचे आजार होते. कोरोना बाधित झाल्यानंतर मृत्यू झालेल्यांमध्ये 14 टक्के लोकं असे होते, ज्यांना इतही व्याधी होत्या.   
 

Web Title: Shocking! In Gujarat, 1 lakh 23 thousand people died in 71 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.