देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सोमवारपासून सुरू झाला असून तो ३१ मेपर्यंत राहील. यात केंद्र सरकारने फक्त कंटेनमेंट झोनपर्यंतच कडक निर्बंध मर्यादित केले होते. तसेच मजुरांना सुरक्षितरित्या आपापल्या घरी पोहचता यावे यासाठी शासनाकडून विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. तरीही काही लोक भीतीपोटी चालतच घरचा रस्ता गाठत आहेत. अशात रस्त्यात अनेकांना मोठ्या संकाटाचा सामना करावा लागला. विशेष ट्रेन सुरू होण्यापूर्वी काही ट्रकमधून, काही कारमधून, काही मोटरसायकलवरून जाताना दिसत आहेत.
मुंबईतील वांद्रे येथे काम करणाऱ्या एका युवकासोबत घरी जात असताना एक विचित्र प्रकार घडला. दुचाकीवरून गावी जात असताना त्याचा अपघात झाला. मुंबईवरून तो उत्तर प्रदेशाताली बांदा येथे जात होता. जवळजवळ 1000 किमीहून जास्त अंतर पार केल्यानंतर त्याचा अपघात झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले गेले. त्याचदरम्यान त्याच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यात तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. ही बाब समोर येताच आता चिंता अजून वाढली आहे. प्रवासादरम्यान हा व्यक्ती ज्या-ज्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता. त्या-त्या व्यक्तींचा आता शोध सुरू आहे.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 1264 झाली आहे. सोमवारी 4629 नवीन रुग्ण वाढले. आतापर्यंत 39 हजार 234 रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, रुग्णांचा बरा होण्याचा दर वाढून 38.29% झाला आहे. देशात 1 लाख लोकसंख्येमागे 7.1 कोरोना रुग्णांची संख्या आहे. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 1 हजार 139 कोरोनाग्रस्त आहेत. 58 हजार 802 रुग्णांवर उपचार सुरू असून 39 हजार 173 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे 3163 जणांचा मृत्यू झाला आहे.