पैशासाठी 'त्या'नं जन्मदात्या आईचा मृतदेह दोन वर्षं फ्रीजमध्ये ठेवला!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 05:52 PM2018-04-05T17:52:37+5:302018-04-05T17:52:37+5:30
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील बेहाला परिसरात पोलिसांना एका महिलेचा मृतदेह दोन वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला.
कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील बेहाला परिसरात पोलिसांना एका महिलेचा मृतदेह दोन वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, बेहाला परिसरात राहणा-या वीमा मजुमदार या महिलेचा मृतदेह गेल्या दोन वर्षापासून फ्रिजमध्ये ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे त्या महिलेच्याच मुलानेच तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला उघडकीस आले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी महिलेचा मुलगा सुब्रत मजुमदार आणि पती गोपाल चंद्र यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच, त्या महिलेचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.
#WestBengal: Police recovered body of a female from a refrigerator inside a house in Behala, Kolkata. The body was preserved for 2 years in the refrigerator by her son. Woman's son and husband detained for interrogation. Investigation underway. pic.twitter.com/DXXzDWme5s
— ANI (@ANI) April 5, 2018
दरम्यान, आरोपी सुब्रत मजुमदार याने आईचा मृत्यू झाल्यानंतर तिला मिळणारी पेन्शन हडपण्यासाठी अशाप्रकारचे घृणास्पद कृत्य केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वीमा मजुमदार ह्या फूड कॉर्फोरेशन ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होत्या. त्या निवृत्त झाल्यानंतर त्यांना महिन्याला पाच हजार रुपयांची पेन्शन मिळत होती.