धक्कादायक! चौथीही मुलगीच झाल्याने पतीनं पत्नीला दिले पेटवून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 05:50 PM2018-03-04T17:50:33+5:302018-03-04T17:50:33+5:30

उत्तर प्रदेशमधल्या बरेली जिल्ह्यातील शाहजहांपुरातील कटरा भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुत्राच्या हव्यासापोटी एक पतीनं पत्नीला जिवंत पेटवून दिले आहे.

Shocking When the fourth girl got married, the husband gave the gift to the wife | धक्कादायक! चौथीही मुलगीच झाल्याने पतीनं पत्नीला दिले पेटवून

धक्कादायक! चौथीही मुलगीच झाल्याने पतीनं पत्नीला दिले पेटवून

Next

बरेली- उत्तर प्रदेशमधल्या बरेली जिल्ह्यातील शाहजहांपुरातील कटरा भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुत्राच्या हव्यासापोटी एक पतीनं पत्नीला जिवंत पेटवून दिले आहे. पुत्राच्या ऐवजी चौथीही मुलगीच झाल्यानं त्या क्रूरकर्मा पतीनं हे अमानुष कृत्य केलं आहे. पतीनं पेटवून दिल्यानंतर 28 वर्षांची पत्नी क्षमा शर्मा हिचा जागीच मृत्यू झाला.

या हत्ये प्रकरणात पोलिसांनी नराधम पती सतीश शर्माला अटक केली आहे.  क्षमा आणि सतीश 2010साली विवाहबद्ध झाले होते. सतीश हा कपड्यांचं दुकान चालवत असल्यानं घरची परिस्थितीत ठीक होती. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांत क्षमाही खूश होती. परंतु पहिलं कन्यारत्न झाल्यानंतर सतीश क्षमाला त्रास देऊ लागला.

मुलाच्या हव्यासापोटी सतीशला लागोपाठ तीन मुली झाल्या. चौथ्यांदा मुलगा होईल ही सतीशला आशा होती. परंतु चौथीही मुलगीच झाल्यानंतर सतीशच्या संतापाला पारावार उरला नाही आणि त्या नराधमानं पत्नीलाच पेटवून दिलं.  चौथी मुलगी आठ महिन्यांची होईपर्यंत सतीश सातत्यानं क्षमाला त्रास देत होता. तो शांत होईल असे वाटत असतानाच तो अधिक आक्रमक झाला. सतीशने क्षमा झोपत असतानाच तिला पेटवून दिले आणि घराला बाहेरून टाळं ठोकून त्यानं पोबारा केला. जळालेल्या अवस्थेत मदतीसाठी याचना करणा-या क्षमाला शेजा-यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला.  लोकांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व क्षमाला रुग्णालयात हलवले. मात्र 90 टक्क्यांहून अधिक भाजल्यानं क्षमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Shocking When the fourth girl got married, the husband gave the gift to the wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.