पाकिस्तानातून आपला प्रियकर असलेल्या सचिन मीनासोबत नेपाळमार्गे ग्रेटर नोएडातील रबुपुरामध्ये पोहोचलेली सीमा हैदर सध्या देशीतील चर्चेचा विषय बनली आहे. ती खरोखरच प्रेमासाठी भारतात आली, की पाकिस्तानची एजन्ट आहे? यावरही चर्चा सुरू आहेत. यूपी एटीएसनेही तिची चौकशी केली आहे. यातच आता, सीमा हैदरसंदर्भात देशातील नागरिकांचा मूड बदलताना दिसत आहे. तिच्या बद्दल लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यापूर्वीच्या एका सर्वेक्षणात सीमा हैदरला भारतात राहू द्यावे असे लोकांना वाटत होते. मात्र आता, तिला पाकिस्तानात परत पाठवावे, असे लोक म्हणत आहे.
काय सांगतो सर्व्हे? -सीमा हैदरला पाकिस्तानात पाठविले जावे की भारतात राहूदिले जावे? यावर टाइम्स नाऊने सर्व्हे केला आहे. यात 75 टक्के लोकांनी, सीमाला भारतात पाठवायला हवे, तिला भारातून बाहेर काढायला हवे, असे म्हटले आहे. तर केवळ 25 टक्के लोकांनीच तिला भारतात राहू द्यावे, असे म्हटले आहे. या सर्व्हेमध्ये दिल्ली, नोएडा, लखनऊ आणि भोपाळमधील लोकांची मते वेगवेगळी असल्याचे दिसून आली आहेत.
सर्व्हेच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये सुमारे 63 टक्के लोकांनी सीमाला भारतात राहू देण्याचे समर्थन केले होते. मात्र, सर्व्हेमध्ये लोकांची संख्या जस-जशी वाढत गेली, तस तसा निकालही बदलत केला. आता 75 टक्के लोक सीमाला भारतात ठेवण्यास विरोध दर्शवत आहेत. दरम्यान, यूपी एटीएस, नोएडा पोलीस आणि आयबीकडून सीमा हैदरची चौकशी तसेच तपास सुरू आहे. याशिवाय गुप्तचर संस्थांचीही सीमावर नजर आहे.
सीमाचं राष्ट्रपतींना पत्र -हेरगिरीचा आरोप आरलेल्या सीमा हैदरने भारतीय नागरिकत्वाची मागणी केली आहे. तिने राष्ट्रपती भवनाकडे याचिकाही केली आहे. तिच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील वकील एपी सिंग यांनी ही याचिका केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सीमाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती केली आहे की, जर आपल्याला माफी मिळाली, तर आपण आयुष्यभर पतीसोबत राहू शकू. एवढेच नाही, तर प्रसिद्ध गायक अदनान सामीला भारतात दीर्घकाळ राहिल्यानंतर नागरिकत्व मिळाले आहे. त्यामुळे आपल्यालाही नागरिकत्व मिळायला हवे. परवानगी मिळाल्यास आपण भारतात सन्मानाने राहू शकू, असेही सीमाने याचिकेत म्हटले आहे.