चंदिगड/मोहाली - 2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष भाजपाला जागा दाखवेल, भाजपाला देशाच्या सत्तेतून उखडून टाकेल, अशी गर्जना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. भाजपाने आपल्या सत्ता काळात न्यायव्यवस्था, लष्कर आणि प्रसारमाध्यमे अशा संस्थांची विश्वसनीयता कमी केली आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. सोमवारी मोहाली येथील एका कार्यक्रमात सहभागी झालेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, आम्ही भाजपाला त्याची जागा दाखवू तसेच त्यांना निवडणुकीत पराभूत करू. 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचा पराभव कसा करता येईल हे आम्ही निश्चित करू,'' यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. भाजपा आणि नरेंद्र मोदींनी देशात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. भाजपा आणि मोदींनी प्रसारमाध्यमांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला आहे. असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आम्हाला काम करू दिले जात नसल्याचे खुलेपणाने सांगत आहेत. तर मोदी लष्कराचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप लष्कराचे जनरल करत आहेत. तसेच निवडणूक आयोगावरही दबाव आणला जात आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. आम्ही लोकशाहीच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या संस्थाच्या रक्षणासाठी आम्ही लढत राहू.आम्ही आरएसएस आणि भाजपासारखे नाही आहोत. सध्या केंद्रात सत्तेवर असलेले भाजपा सरकार बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्यास प्रसारमाध्यमांना मज्जाव करत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
भाजपाला त्याची जागा दाखवू, दिल्लीच्या सत्तेतून उखडून टाकू, राहुल गांधींची गर्जना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 5:16 PM
2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष भाजपाला जागा दाखवेल, भाजपाला देशाच्या सत्तेतून उखडून टाकेल, अशी गर्जना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
ठळक मुद्दे2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष भाजपाला जागा दाखवेल, भाजपाला देशाच्या सत्तेतून उखडून टाकेल, अशी गर्जना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली भाजपाने आपल्या सत्ता काळात न्यायव्यवस्था, लष्कर आणि प्रसारमाध्यमे अशा संस्थांची विश्वसनीयता कमी केली आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केलासध्या केंद्रात सत्तेवर असलेले भाजपा सरकार बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्यास प्रसारमाध्यमांना मज्जाव करत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला