सिद्धरामय्या नरमले? कर्नाटकचे सरकार 5 वर्षे टिकणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 08:54 PM2018-08-31T20:54:13+5:302018-08-31T20:57:00+5:30

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मंत्रीमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Siddharamaiah softened? Karnataka government will last 5 years! | सिद्धरामय्या नरमले? कर्नाटकचे सरकार 5 वर्षे टिकणार!

सिद्धरामय्या नरमले? कर्नाटकचे सरकार 5 वर्षे टिकणार!

Next

बंगळुरु : विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत न मिळाल्याने मुख्यमंत्री पदावरून दूर रहावे लागलेल्या काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज मवाळ भूमिका घेतली आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाला काँग्रेसने दिलेला बिनशर्त पाठिंबा कायम राहणार असून हे सरकार पुढील पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी आज सांगितले. 


कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या यांच्याकडून मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना सातत्याने इशारे देण्याचे प्रकार सुरु होते. यामुळे धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात कुमारस्वामींना अश्रू अनावर झाले होते. मंत्रालय वाटपावरूनही तणाव निर्माण झाला होता. तसेच पुन्हा मुख्यमंत्री बनण्याबाबतच्या सिद्धरामय्या यांच्या वक्तव्यानेही कर्नाटकमध्ये खळबळ माजली होती. परंतू आज अचानक सिद्धरामय्या यांनी नरमाईची भुमिका घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 





 कर्नाटकचे सरकार पाच वर्षांचा कार्य़काळ पूर्ण करेल. आम्ही एक आहोत. सरकार योग्य दिशेने चालत आहे. भाजपने सरकारची काळजी करण्याऐवजी निवडणुकीत मोदींनी दिलेल्या अव्वाच्यासव्वा आश्वासनांच्या पुर्ततेची काळजी करावी असा टोलाही सिद्धरामय्या यांनी लगावला. तसेच सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मंत्रीमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Siddharamaiah softened? Karnataka government will last 5 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.