राहुल गांधींना 'डायपर'मधून बाहेर पडायचंच नाही, उत्तर प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांची वादग्रस्त टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 09:42 AM2017-10-10T09:42:12+5:302017-10-10T09:42:46+5:30

उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे.  'काँग्रेसचे दुर्देव आहे की (राहुल गांधी)हे बाळ अजून मोठे होत नाही, त्यांना 'डायपर'मधून बाहेर पडायचेच नाही', अशी वादग्रस्त टीका सिद्धार्थ नाथ सिंह यांनी केली आहे.

siddharth nath singh target to rahul gandhi after tweet on amit shah son jai shah case | राहुल गांधींना 'डायपर'मधून बाहेर पडायचंच नाही, उत्तर प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांची वादग्रस्त टीका

राहुल गांधींना 'डायपर'मधून बाहेर पडायचंच नाही, उत्तर प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांची वादग्रस्त टीका

Next

मुंबई - उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे.  'काँग्रेसचे दुर्देव आहे की (राहुल गांधी)हे बाळ अजून मोठे होत नाही, त्यांना 'डायपर'मधून बाहेर पडायचेच नाही', अशी वादग्रस्त टीका सिद्धार्थ नाथ सिंह यांनी केली आहे.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या संपत्तीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजपानंदेखील काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'हे बाळ अजून मोठं होत नाहीए, हे काँग्रेसचं दुर्देव आहे. त्यांना 'डायपर'मधून बाहेर पडायचेच नाही', अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी टीका केली आहे.  

राहुल गांधी यांनी जय शहाच्या संपत्तीच्या मुद्याबाबत एक ट्विट केले होते. 'मोदीजी, जय शहांनी खपूच खाल्लं आहे. तुम्ही पहारेकरी होता की भागिदार? काही तरी बोला', असा प्रश्न राहुल यांनी या ट्विटद्वारे उपस्थित केला. राहुल गांधी यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना सिद्धार्थ नाथ सिंह यांनी ही टीका केली. राहुल यांना 'डायपर'मधून बाहेर पडायचेच नसल्याची टीका त्यांनी केली.
दरम्यान, सिद्धार्थ नाथ सिंह यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्यावरही टीकास्त्र सोडले. 

 




Web Title: siddharth nath singh target to rahul gandhi after tweet on amit shah son jai shah case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.