हृदयाचे १०० ठोके पडताच चालणार स्मार्ट ई-सायकल; बीटेक विद्यार्थ्यांचे संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 01:47 PM2024-05-19T13:47:25+5:302024-05-19T13:49:49+5:30
हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अशा सायकलमुळे टाळता येऊ शकतो. ही सायकल तयार करायला २० ते २५ हजारांचा खर्च आला आहे.
बलवंत तक्षक
चंडीगड : हिमाचल प्रदेशात हमीरपूर येथे एनआय़टीमधील इंजिनीअरिंग विभागाच्या बी. टेक. अभ्यासक्रमात अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांनी हृदयाच्या ठोक्यांवर आधारित एक स्मार्ट ई-सायकल तयार केली आहे. हृदयाचे ठोक्यांचे प्रमाण प्रति मिनिट १०० झाले की ही सायकल आपोआप चालायला लागेल.
हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अशा सायकलमुळे टाळता येऊ शकतो. ही सायकल तयार करायला २० ते २५ हजारांचा खर्च आला आहे.
हृदयाचे ठोके प्रति मिनिट १००पर्यंत पोहोचले की या सायकलला बॅटरीद्वारे वीजपुरवठा होणे सुरू होईल व पॅडल चालू लागतील. ही ई-सायकल बॅटरी व मोटरच्या मदतीने स्कुटीप्रमाणे काम करेल.
ई-सायकलचे घेणार पेटंट
एनआयटीचे सहायक प्राध्यापक डॉ. दिलशाद अहमद खान यांच्या मार्गदर्शनाखाली
यश पंथरी, अंजली ठाकूर, अनुपमा,
कर्तव्य चंदेल यांनी हृदयाच्या ठोक्यांवर आधारित ही स्मार्ट
ई-सायकल बनवली आहे. लवकरच या सायकलचे पेटंट घेतले जाणार आहे.