वाहतूक व्यवस्थापनाचा स्मार्ट प्रयोग; आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:07 AM2018-06-09T00:07:32+5:302018-06-09T00:07:32+5:30

राजधानी दिल्लीमध्ये होणारी वाहतुकीची कोंडीच्या व्यवस्थापनासाठी पोलिसांनी आर्टिर्फिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम प्रज्ञा) तंत्रज्ञान वापरण्याचे ठरविले असून, त्याची कार्यवाही पुढच्या वर्षी होण्याची शक्यता आहे. यासाठी एक हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Smart use of traffic management; Use of Artificial Intelligence | वाहतूक व्यवस्थापनाचा स्मार्ट प्रयोग; आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर

वाहतूक व्यवस्थापनाचा स्मार्ट प्रयोग; आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर

Next

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये होणारी वाहतुकीची कोंडीच्या व्यवस्थापनासाठी पोलिसांनी आर्टिर्फिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम प्रज्ञा) तंत्रज्ञान वापरण्याचे ठरविले असून, त्याची कार्यवाही पुढच्या वर्षी होण्याची शक्यता आहे. यासाठी एक हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या योजनेबद्दल नायब राज्यपाल अनिल बैैजल यांच्याशी चर्चा केली. या योजनेसाठी तांत्रिक सल्लागार नेमला जाणार आहे. व्यवस्थापनासाठी लागणारे व सेन्सर असलेले कॅमेरे खरेदी करण्यासाठी जुलैैमध्ये निविदा काढण्यात येईल. दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त (वाहतूक विभाग) दीपेंदर पाठक म्हणाले की, दिल्लीच्या मुख्य मार्गांवर इन्फ्रारेड व कलरलेस सेन्सरयुक्त सात ते आठ हजार कॅमेरे बसविले जातील. ते वाहनांवर बारीक लक्ष ठेवतील. काही गैैरप्रकार आढळून आल्यास संबंधित वाहनचालकाशी संवाद साधण्याची सोयही यात असेल. अशा प्रकारे दिल्लीतील वाहतुकीचे व्यवस्थापन सुरू झाल्यानंतर पहिल्या काही महिन्यांत रस्तोरस्ती बसविलेल्या हजारो कॅमेºाांतून जी माहिती गोळा होईल, तिचे सॉफ्टवेअरद्वारे विश्लेषण केले जाईल. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पोलिसांवरील भार खूपच हलका होईल.

एलईडी बोर्डही बसविणार
कॅमेरांबरोबरच एक हजार एलईडी बोर्डांचीही खरेदी दिल्ली वाहतूक पोलिस करणार आहेत. आर्टिर्फिशिअल इंटेलिजन्सयुक्त सॉफ्टवेअर व कॅमेराची जोड दिलेल्या या एलइडी बोर्डावरील माहितीमुळे वाहनचालकांना कोणत्या मार्गाने जावे व कोणता रस्ता टाळावा याची अचूक माहिती मिळण्यास मदत होईल. वाहतुकीती अडथळे कॅमेरे त्वरित टिपतील. आर्टिर्फिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होण्यासाठी दिल्लीत नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये प्रकारची चीप बसविणे बंधनकारक करावे असे पत्र दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Smart use of traffic management; Use of Artificial Intelligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.