बंगळुरू- नदीवर कोणत्याच राज्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने कावेरी नदीतून तामिळनाडूला मिळणा-या पाण्यात कपात करताना कर्नाटकचा वाटा काहीसा वाढवला आहे. त्यानंतर तामिळनाडू सरकारसह चित्रपट अभिनेते कमल हसन आणि अभिनेते रजनीकांत यांनी या पाणीवाटपाला विरोध केला. तसेच कावेरी व्यवस्थापन मंडळ (सीएमबी) स्थापन करण्यास होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ तमीळ चित्रपटसृष्टीने एक दिवसाच्या उपोषणात भाग घेतला होता.वल्लूवरकोट्टम येथे झालेल्या या उपोषणात प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत व कमल हासन सहभागी झाले होते. त्याच मुद्द्यावर कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भाष्य केलं आहे. मी रजनीकांत यांना शपथविधी सोहळ्याला बोलावून जलाशयातील पाणीपातळी दाखवणार आहे. जलाशयात पाणी पुरेसे नाही. मला विश्वास आहे ते समजून घेतली, असं कुमारस्वामी म्हणाले आहेत. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ व पुद्दुचेरीमध्ये कावेरी नदीच्या पाणी वाटपाबाबत केंद्राने कावेरी व्यवस्थापन योजनेचा मसुदा सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.
कावेरी पाणी वाद...म्हणून 'द बॉस' रजनीकांतला शपथविधीला बोलावणार कुमारस्वामी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 11:40 AM