'... म्हणून महाराष्ट्र दिनी हा निर्णय आला', संजय राऊतांकडून केंद्र सरकारचे धन्यवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 12:07 PM2020-05-01T12:07:54+5:302020-05-01T12:09:26+5:30

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी तातडीने निवडणुका घेण्याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे शिफारस करावी, असे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांना पाठवले होते

'... So this decision came on Maharashtra Day', thanks from Sanjay Raut to the Central Government on twitter MMG | '... म्हणून महाराष्ट्र दिनी हा निर्णय आला', संजय राऊतांकडून केंद्र सरकारचे धन्यवाद

'... म्हणून महाराष्ट्र दिनी हा निर्णय आला', संजय राऊतांकडून केंद्र सरकारचे धन्यवाद

Next

मुंबई - भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानपरिषेच्या निवडणुकी घेण्याची परवानगी दिल्याने मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंच्या आमदरकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यावरुन, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. आता, राज्यात निर्माण झालेले राजकीय अनिश्चिततेच्या वातावरणाचा धुरळा खाली बसेल. महाराष्ट्राची पुण्याई मोठी म्हणून महाराष्ट्र दिनी हा निर्णय आला, असे म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. 

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी तातडीने निवडणुका घेण्याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे शिफारस करावी, असे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांना पाठवले होते. याच पत्राचा आधार घेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. २४ एप्रिल पासून राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त आहेत. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेण्याची विनंती राज्यपाल यांनी निवडणुक आयोगाला केली होती. राज्यपालांच्या या विनंतीनंतर निवडणुक आयोगाने राज्यातील विधान परिषच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) महाराष्ट्रातील विधान परिषद (एमएलसी) निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या  निवडणुकांदरम्यान कोरोनाचा विचार करता सुरक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत, तसेच राज्यातील राजकीय अनिश्चिततेच्या वातावरणाचा धुरळा खाली बसेल, असेही म्हटले. 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या या जागा गेल्या २४ एप्रिलपासून रिक्त आहेत. निवडणूक आयोगाने या जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घ्यावी आणि राज्यात निर्माण झालेला मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवावा, अशी विनंती राज्यपाल कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. यानंतर निवडणुक आयोगाने विधान परिषदेच्या जागांची निवडणुका घेणयास परवानगी दिली आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी येत्या २८ मेपर्यंत विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. कोरोनामुळे राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने हा राजकीय पेच निर्माण झाला होता. मात्र आता निवडणुक आयोगाने निवडणुका घेण्यास परवानगी दिल्याने उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: '... So this decision came on Maharashtra Day', thanks from Sanjay Raut to the Central Government on twitter MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.