...म्हणून मजुराने चोरली सायकल अन् लिहिलेला माफीनामा झाला व्हायरल  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 10:57 PM2020-05-16T22:57:53+5:302020-05-16T23:01:45+5:30

भरतपूर मधील सहानावली या गावातून साहीब सिंह नामक व्यक्तिच्या घराबाहेरील सायकल या मजुराने चोरली.

... so the worker has stolen bicycle unwritten apology letter went viral pda | ...म्हणून मजुराने चोरली सायकल अन् लिहिलेला माफीनामा झाला व्हायरल  

...म्हणून मजुराने चोरली सायकल अन् लिहिलेला माफीनामा झाला व्हायरल  

googlenewsNext
ठळक मुद्देमोहम्मद इक्बाल खान असे या मजुराचे नाव आहे.राजस्थानच्या भरतपूर येथील एका मजुराने उत्तर प्रदेशमधील बरेली येथे जाण्यासाठी सायकल चोरली. आपल्या अंपग मुलाला बरेलीत घरी नेण्यासाठी त्याच्याकडे पर्याय  नसल्याने ही सायकल चोरी केली.

राजस्थान (भरतपूर) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन घोषित करुन आता ५० हून अधिक दिवस झाले आहेत. त्यामुळे आपल्या घरी परतण्यासाठी व्याकुळ झालेल्या मजुरांनी मिळेल त्या वाटेने घर गाठण्यास सुरुवात केली आहे. कोणी चालत, कोणी सायकलने तर कोणी मिळेल त्या वाहनातून मजुरांचा प्रवास सुरु आहे. राजस्थानच्या भरतपूर येथील एका मजुराने उत्तर प्रदेशमधील बरेली येथे जाण्यासाठी सायकल चोरली. सायकलची चोरी केल्यानंतर या मजुराने एक पत्र सायकलमालकाला लिहून तेथेच सोडले आहे. या पत्रातील मजकुरामुळे हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मोहम्मद इक्बाल खान असे या मजुराचे नाव आहे. भरतपूर मधील सहानावली या गावातून साहीब सिंह नामक व्यक्तिच्या घराबाहेरील सायकल या मजुराने चोरली.


आपल्या अंपग मुलाला बरेलीत घरी नेण्यासाठी त्याच्याकडे पर्याय  नसल्याने ही सायकल चोरी केली. नंतर त्याने भरतपूर ते बरेली असा २५० किमींचा प्रवास पुर्ण केला. ही सायकल चोरी करत असताना मोहम्मदने एक पत्र लिहून साहीब सिंह यांची माफी मागितली आहे. मात्र पत्राच्या शेवटी लिहिलेली एक ओळ वाचून अनेकांचे हृदय पिळवटून निघाले आहे. इक्बाल खानने पत्रात लिहिले की, “मी मजूर आहे आणि मजबूर देखील. मी तुमचा गुन्हेगार देखील आहे. तुमची सायकल घेऊन जात आहे. मला क्षमा करा. मला बरेलीपर्यंत जायचे आहे. माझ्याजवळ कोणतेच जाण्यासाठी पर्याय नाही. शिवाय एक दिव्यांग मुलगा देखील माझ्यासोबत आहे.” इक्बाल खानचा मुलगा चालू शकत नसल्यामुळे त्याने असे केल्याचा अंदाज आहे.  

 

Coronavirus : लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर केला जीवघेणा हल्ला  

 

Coronavirus : अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त आरोपींची काढण्यात आली होती धिंड

 

भारत नको! मुंबईच्या तुरुंगात उंदीर, किडे; घोटाळेबाज नीरव मोदीचा कांगावा

Web Title: ... so the worker has stolen bicycle unwritten apology letter went viral pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.